महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

... म्हणून बापाने केला तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा दगडाने खून - गुन्हे बातमी

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिन दिवसांपूर्वीच जन्मलेल्या पोटच्या मुलीचा दगडाने मारहाण करत खून केल्याची घटना नेवासा तालुक्यातील मक्तापूर शिवार परिसरात घडली आहे.

आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर पोलीस
आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर पोलीस

By

Published : Jul 11, 2020, 12:09 AM IST

Updated : Jul 11, 2020, 6:16 AM IST

नेवासा (अहमदनगर) - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत स्वतःच्या तीन दिवसाच्या नवजात मुलीस बापानेच दगडाने मारहाण करत खून केल्याची धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील मक्तापूर शिवार परिसरात घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 9 जुलै) घडली असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी

अजय मिरीलाल काळे, असे त्या निर्यदी बापाचे नाव आहे. अजय हा तिच्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. याच कारणाने अजय व तिच्या पत्नीमध्ये सतत भांडणेही होत होती. गुरुवारीही भांडण झाले, त्यावेळी रागाच्या भरात अजयने पत्नीस मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तीन दिवसांपूर्वीच जन्मलेल्या पोटच्या मुलीला दगडाने मारहाण केली. यात त्या चिमुकलीचा जीव गेला. त्यानंतर अजयने घरातून पळ काढला. अजयच्या पत्नीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांनी नेवासा पोलीस पोलीस ठाण्यास भेट दिली. तपासाच्या अनुषंगाने नेवासा पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. अजयच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली.

अजय हा जवळच असलेल्या उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी उसाच्या शेतात अजयचा शोध सुरू केला. अजय हा तेथूनही पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी अजयला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात सात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

याबाबत अजयच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन अजय मिरीलाल काळे याच्या विरोधात भा.दं.वि.च्या कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी. के. शेवाळे व पोलीस शिपाई भागवत शिंदे करत आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांनी दिली.

ही कामगिरी पोलीस अक्षीक्षक अखिलेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळी, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित डेरे, सहायक पोलीस निरीक्षक व्ही.डी.ठाकूर, पोलीस निरीक्षक बी.एच.दाते, पोलीस नाईक राहुल यादव, सोमनाथ कुढारे, महेश कचे, नानासाहेब, पोलीस शिपाई संभीज गर्जे, अशोक कुदळे, गणेश गलधर, केवल रजपूत, रवि पवार, संदिप म्हस्के, महिला पोलीस शिपाई शंदे, चालक पोलीस शिपाई कुऱ्हाडे, मेजर बडे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा -पारनेर नगरसेवक प्रकरणावर पडदा; मात्र शिवसेना-राष्ट्रवादीतील खदखद न संपणारी..

Last Updated : Jul 11, 2020, 6:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details