महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नात्याला काळीमा..! पित्यानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार - ahmednagar crime news

जन्मदात्या पित्यानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नराधमाविरोधात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रावरून संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

c
c

By

Published : Sep 30, 2021, 3:23 PM IST

अहमदनगर -संगमनेर येथे पित्याकडूनच पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पीडितेच्या पित्याविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नराधम पित्यास पोलिसांनी अटक केली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वाडीत आई-वडिलांसोबत राहणाऱ्या 11 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीच्या आईचे आणि पित्याचे वाद झाले होते. आई गेल्या काही दिवसांपासून बाहेरगावी गेली होती. या काळातच, 22 जुलैच्या रात्री, 28 जुलैच्या रात्री आणि यानंतर दोन आठवड्यानंतर, असे तीन वेळा पित्याने आपल्याच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. मुलगी झोपलेली असताना तिच्याशी अत्याचार केल्याचे तक्रारीत पीडित मुलीच्या आईने म्हटले आहे. मुलीला त्रास होऊ लागल्याने हा प्रकार समोर आला.

याबाबत पीडितेच्या आईने बुधवारी समंगनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रारीवरुन नराधम पित्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून नराधमास अटक केली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली आहे.

हेही वाचा -अहमदनगर : शिकवणीच्या नावे विद्यार्थिनींना बोलवायचा अन् करायचा अश्लील चाळे

ABOUT THE AUTHOR

...view details