महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डाळिंब बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत.. क्रॉप कव्हर आच्छादून उन्हापासून संरक्षण

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेतकरी वेगवेगळे प्रयोग करुन डाळिंब पिकाची देखरेख करत आहेत. पाण्याची कमतरता आहेच; पण उन्हामुळे डाळिंब बागेचा दर्जा घसरत चालला आहे. शेतकरी पाण्याचा गारवा टिकून रहावा म्हणून पाचटाचे आच्छादन जमिनीवर अंथरत आहेत.

By

Published : Apr 9, 2019, 10:39 AM IST

डाळिंब बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत.. क्रॉप कव्हर आच्छादून उन्हापासून संरक्षण

अहमदनगर -कमी पर्जन्यमानाबरोबरच उष्णता अधिक वाढल्याने उन्हाच्या तीव्रतेपासून डाळिंब बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झालेली पहिला मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील बोटा येथील राजेद्र विठ्ठल शेळके या शेतकऱ्याने आपल्या पाच एकर शेती पैकी तीन एकर डाळिंब बागेला क्रॉप कव्हरचे अच्छादन टाकून आपली डाळिंब बागा वाचवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

डाळिंब बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत.. क्रॉप कव्हर आच्छादून उन्हापासून संरक्षण

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेतकरी वेगवेगळे प्रयोग करुन डाळिंब पिकाची देखरेख करत आहेत. पाण्याची कमतरता आहेच; पण उन्हामुळे डाळिंब बागेचा दर्जा घसरत चालला आहे. शेतकरी पाण्याचा गारवा टिकून रहावा म्हणून पाचटाचे आच्छादन जमिनीवर अंथरत आहेत. डाळींब बागेला पाण्याची कमतरता भासत असल्याने साठवलेले शेततळे, विहिरी, बोअरवेल इ. साठे संपुष्टात आल्याने शेतकरी आपले पिके लवकर देत आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नदीनाल्यांना पाणी आले नाही.

पर्यायाने विहिरी, बोअरवेल यांना पाणीच न उतरल्याने पाच ते सहा वर्षापासून सांभाळून ठेवलेल्या बागा संपुष्टात येण्याची वेळ आली आहे. शेळके यांनी शेततळे, विहिरी बोअरवेल यांचा वापर करून आतापर्यंत डाळिंबबाग जागवली आहे. पण ऐन पिक देण्याच्या वेळीस पाण्याची कमतरता भासत असल्याने पिक लवकर देण्याची वेळ आली आहे.

यावर्षी पाण्याच्या कमतरतेबरोबर उष्णता वाढल्याने तीन एकर डाळिंब बागेला क्रॉप कव्हर करून बागा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ६० हजार रुपये खर्च आला आहे. पुढचे २ महिने बागांसाठी महत्वाचा कालावधी आहे. डाळिंबाच्या बागा वाचविण्यासाठी संघर्ष करावा लगत असल्याच शेतकरी राजेद्र विठ्ठल शेळके यांनी म्हटले आहे

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details