महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केके रेंजमध्ये जमिनी जाणार नाहीत, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

केके रेंज या लष्करी सराव क्षेत्रात राहुरी, पारनेर आणि नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी लष्कर नव्याने सरावासाठी संपादित करणार असल्याची साशंकता शेतकऱ्यांमध्ये आहे. लष्करी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता नव्याने जमिनी संपादित करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडून आलेला नसल्याचे राज्यमंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले असून, राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, अशी ग्वाही माध्यमांशी बोलताना दिली.

By

Published : Feb 4, 2020, 11:16 AM IST

राज्यमंत्री तनपुरे यांच्या उपस्थितीत लष्करी अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक
राज्यमंत्री तनपुरे यांच्या उपस्थितीत लष्करी अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक

अहमदनगर -जिल्ह्यातील 'केके रेंज' या 'लष्करी सराव क्षेत्रा'त नव्याने राहुरी, पारनेर, नगर या तालुक्यातील शेतजमिनी सध्यातरी संपादित करण्याचा प्रस्ताव सरकारकडे नाही. मात्र, अशाही परिस्थितीमध्ये राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही लष्करी अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती ऊर्जा आणि नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

राज्यमंत्री तनपुरे यांच्या उपस्थितीत लष्करी अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक

केके रेंज या क्षेत्रात राहुरी, पारनेर आणि नगर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. आता नव्याने सरावासाठी लष्कर शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करणार असल्याची कुणकुण असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाची एक संयुक्त बैठक राज्यमंत्री तनपुरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. तनपुरे हे स्वतः राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांनी याबाबत लष्करी अधिकाऱ्यांकडून सखोल माहिती घेतली. याबाबत लष्करी अधिकाऱ्यांनी नव्याने जमिनी संपादित करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडून आलेला नसल्याचे स्पष्ट केले. तर, राज्यमंत्री तनपुरे यांनी राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, अशी ग्वाही माध्यमांशी बोलताना दिली.

हेही वाचा -तब्बल 20 तासानंतर सापडला पाण्यात वाहुन गेलेल्या महिलेचा मृतदेह

भविष्यात लांब पल्ल्याच्या तोफगोळ्यांची चाचणी आणि सराव केके रेंजमध्ये घेतला जाण्याची चर्चा आहे. त्यासाठी नव्याने जमिनी संपादित केल्या जाऊ शकतात का? यावर सध्या स्पष्टता नाही. तरीही अगोदरच मुळा धरण आणि केके रेंजच्या सध्याच्या क्षेत्रात जमिनी गेलेल्या पुनर्वसीत शेतकऱ्यांमधे साशंकता दिसून येत आहे.

हेही वाचा - मोहिनीराज यात्रा महोत्सवाला सुरूवात, दिव्यांनी उजळले मंदिर

ABOUT THE AUTHOR

...view details