महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पारनेर पंचायत समितीमध्ये मनमानी कारभार? शेतकऱ्यांनी काढला मोर्चा - टिकूरे मोर्चा

पारनेर पंचायत समितीमधे सभापती आणि गट विकास अधिकाऱ्यांवर भ्रष्ट आणि मनमानी कारभाराचा आरोप होत आहे. जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांनी हा आरोप करत पंचायत समितीवर मोर्चा काढला. यावेळी पारनेर तालुक्यातील शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर येथे पंचायत समितीवर शेतकऱ्यांचा मोर्चा

By

Published : Aug 16, 2019, 8:18 PM IST

अहमदनगर- येथील पारनेर पंचायत समितीमध्ये सभापती आणि गट विकास अधिकाऱ्यांवर भ्रष्ट आणि मनमानी कारभाराचा आरोप होत आहे. जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांनी हा आरोप करत पंचायत समितीवर मोर्चा काढला. यावेळी पारनेर तालुक्यातील शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर येथे पंचायत समितीवर शेतकऱ्यांचा मोर्चा

दिव्यांगांना योजनांपासून वंचित ठेवणे, रोजगार हमी योजनेतील विहिरीसाठी तीस हजार रुपये कमिशन मागणे, शौचालय अनुदानात पैशाची मागणी करणे, वाढीव किंमतीच्या निविदा मंजूर करुन ठेकेदाराकडून टक्केवारी वसूल करणे, आदी आरोप यावेळी आझाद ठुबे यांनी केले. दरम्यान या आरोपांची चौकशी करुन सभापती आणि गट विकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ठुबे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details