अहमदनगर- नगर-पुणे मार्गावर असलेल्या सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडोच्या संख्येने तरुणाई रोजगाराच्या नव्या संधीच्यानिमित्ताने एकत्र आली होती. मुख्यत्वे पारनेर, नगर, शिरूर तालुक्यातील शिक्षीत तरुण-तरुणींची यात मोठी उपस्थिती होती. विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अशा जवळपास 75 कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
सुपा एमआयडीसीत लंके प्रतिष्ठानच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन; 75 कंपन्यांचा प्रतिसाद - job
या विविध कंपन्यात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधीबद्दलची माहिती देण्यात आली. तसेच पात्र उमेदवारांना यावेळी नियुक्ती पत्रे देण्यात आली.
या विविध कंपन्यात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधीबद्दलची माहिती देण्यात आली. तसेच पात्र उमेदवारांना यावेळी नियुक्ती पत्रे देण्यात आली. सुपा, रांजणगाव, चाकण आदी औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सुपा, रांजणगाव, चाकण परिसरात अनेक मोठे उद्योग येत असून ग्रामीण भागातील शिक्षीत तरुणाईला येथील उपलब्ध रोजगराबद्दल माहिती नसते. त्यामुळे या रोजगार मेळाव्याचे आयोजन करून त्यांना नवं-नवीन करिअरच्या संधी यानिमित्ताने उपलब्द करून देण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश लंके यांनी यावेळी सांगितले..