अहमदनगर - कोपरगाव येथील गोदावरी नदीला पूर आल्याने शिर्डी शहराला वीज पुरवठा करणारी यंत्रणा तब्बल २ तासासाठी बंद पडली होती. त्यामुळे शहरात अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत.
गोदावरी नदीला पूर आल्याने शिर्डीतील वीजपुरवठा खंडित; शहरात अनेक व्यवहार ठप्प - वीजपुरवठा
कोपरगावहून शिर्डीला येणारी ३३ केव्ही लाईनची वायर पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शिर्डीला होणारा वीज पुरवठा २ तासासाठी खंडित झाला होता. त्यामुळे शहरात अनेक व्यवहार ठप्प झाले.
वीज खंडित झाल्याने शिर्डीतील व्यवहार ठप्प
कोपरगावहून शिर्डीला येणारी ३३ केव्ही लाईनची वायर पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शिर्डीला होणारा वीज पुरवठा २ तासासाठी खंडित झाला होता. तर राहाता उपविभागाकडे विजेचा लोड पुरेसा नसल्याने शिर्डीला वीज देणे शक्य नसल्याची परिस्थिती उद्भवली आहे. दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील बँक व्यवहार, सायबर कॅफे तसेच अन्य व्यवस्था ठप्प झाले आहेत. त्यामुळे शिर्डी ग्रामस्थांबरोबर साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मोठे हाल झालेले दिसून आले आहे.