महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उन्हाच्या काहिलीत उमेदवारांची गाववारी, मतदारराजा सावलीच्या शोधात - voting

उन्हामुळे आणि शेतीची कामे याकाळात थांबलेली असतात. त्यामुळे गावखेड्यातील मतदाराकडे वेळ असला, तरी भर उन्हात उमेदवाराच्या सभेला जायचे म्हणजे नको होत आहे. त्यामुळे एकूणच सभेतील उपस्थितीवर त्याचा परिणाम होत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.

उन्हाच्या काहिलीत उमेदवारांची गावंवारी, मतदारराजा सावलीच्या शोधात

By

Published : Apr 15, 2019, 11:44 AM IST

अहमदनगर -सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकांमुळे विविध पक्षांचे प्रचारसत्रही तापलेले पाहायला मिळत आहेत. अशातच ऐन उन्हाळ्यात होत असलेल्या या निवडणुकांमुळे मात्र, मतदारराजाची दमछाक होत आहे.

राज्यात विदर्भासारखीच तीव्र उन्हाची परस्थिती अहमदनगर जिल्ह्यात आहे. गेल्या आठवडाभरापासून येथील तापमान ४० अंश सेल्सीअसच्यावर आहे. कधी ४२ अंश तापमान जिल्ह्यात असल्याने प्रचारसभा ऐन भरात येत असताना उमेदवारांना गावखेड्यातील वाड्यावस्त्यांपर्यंतच्या शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचणे क्रमप्राप्त आहे.

उन्हाच्या काहिलीत उमेदवारांची गावंवारी, मतदारराजा सावलीच्या शोधात

उन्हामुळे आणि शेतीची कामे याकाळात थांबलेली असतात. त्यामुळे गावखेड्यातील मतदाराकडे वेळ असला, तरी भर उन्हात उमेदवाराच्या सभेला जायचे म्हणजे नको होत आहे. त्यामुळे एकूणच सभेतील उपस्थितीवर त्याचा परिणाम होत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. सर्वच उमेदवारांना या वाढत्या उन्हामुळे प्रचारावर परिणाम होत असल्याची जाणीव आहे.
गावात वेस, चौक आदी ठिकाणी छोटेखानी चावडी, घोंगडी, कॉर्नर सभांचे आयोजन होत आहेत. तरी, मतदारराजा झाडाखाली कुठे सावली मिळते का ते शोधूनच सभेत आसनस्थ होताना दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details