महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याने वृद्ध महिलेचा गळा दाबून केली हत्या

कौठेकमळेश्वर गावात दुपारी दीड वाजेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्याने एका ८० वर्षाच्या वृद्धेचा गळा दाबून हत्या केली. या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

elderly-woman-was-strangled-to-death-by-a-thief-who-came-with-intention-of-stealing-in-ahmednagar
अहमदनगर : चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याने वृद्ध महिलेचा गळा दाबून केली हत्या

By

Published : Jan 19, 2021, 8:15 PM IST

अहमदनगर -संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात दुपारी दीड वाजेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्याने एका ८० वर्षे वयाच्या वृद्धेचा गळा दाबून हत्या केली. सावित्राबाई मोगल शेळके, असे या हत्या झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

वृद्ध महिलेचा गळा दाबून केली हत्या -

कौठेकमळेश्वर गावात संगमनेर रस्त्याच्याकडेला सावित्राबाई मोगल शेळके ही वृद्ध महिला राहत होती. तिचे घराजवळ गोळ्या बिस्कीटचे छोटे दुकान होते. ती मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घरात एकटीच असताना अज्ञात चोरट्याने तिच्या घरात प्रवेश केला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्याने वृद्ध महिलेचा गळा दाबून तिची हत्या केली. दरम्यान, एक पाच वर्षाची मुलगी गोळ्या घेण्यासाठी त्या ठिकाणी आली असता, तिने हा प्रकार बघितला. त्यानंतर चोरट्याने लहान मुलीच्या कानातील सोन्याचे दागिनेही काढून घेतले. दागिने काढताना कान जखमी झाल्याने ती मुलगी रडत घरी गेली. तिने हा प्रकार उपस्थितांना सांगितल्यानंतर शेजाऱ्यांनी वृद्ध महिलेच्या घराकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत चोरटा फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वृद्ध महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला.

हेही वाचा - देशी बनावटीच्या मेट्रोचे 29 जानेवारीला मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते अनावरण

ABOUT THE AUTHOR

...view details