महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना २ रिक्षांनी घेतला पेट - gas filling

सर्जेपुऱ्यासह शहरात अनेक ठिकाणी गॅस किट बसवलेल्या चारचाकी, तीनचाकी ऑटो-वाहनात अवैधपणे गॅस रिफिलिंग केले जाते. यात अनेकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार बिनदिक्कत उघड्यावर सुरू आहे.

रिक्षा पेटल्यानंतरचा व्हिडिओ

By

Published : Apr 8, 2019, 4:16 AM IST

अहमदनगर - शहरातील सर्जेपुरा या गजबजलेल्या भागात ऑटो रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस रिफिंल करून देत असताना गॅसने अचानक पेट घेतला. त्या रिक्षाच्या बाजूलाच उभे असलेल्या दुसऱ्या रिक्षानेही पेट घेतला. गॅस लिकेज झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.

रिक्षा पेटल्यानंतरचा व्हिडिओ


अग्निशमन दलाचे बंब येईपर्यंत रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाला होता. या घटनेमुळे नागरिकांत एकच घबराट उडाली होती. सुदैवाने आजूबाजूचे दुकाने आणि नागरिकांना या आगीची कोणतीही झळ बसली नाही. सर्जेपुऱ्यासह शहरात अनेक ठिकाणी गॅस किट बसवलेल्या चारचाकी, तीनचाकी ऑटो-वाहनात अवैधपणे गॅस रिफिलिंग केले जाते. यात अनेकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार बिनदिक्कत उघड्यावर सुरू आहे. याकडे पोलीस, मनपा विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी अशा अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे. रविवारी झालेल्या प्रकरणाची तोफखाना पोलीस अधिक चौकशी करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details