अहमदनगर - राहता तालुक्यातील पंधरा चारी शिवारात दत्तु मुरलीधर डापसे या मेंढपाळाची घोडी विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने मरण पावली. ही घटना 4 जुलैला घडली.
अहमदनगरमध्ये लोंबकळणाऱ्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने मेंढपाळाची घोडी दगावली - महावितरण
महावितरणचे दुर्लक्ष झाल्यामुळे एका मेंढपाळाची घोडी विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने मरण पावल्याची घटना घडली आहे.परिसरातील लोकांच्या मनात भितीयुक्त वातावरण तयार झाले आहे.
ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या परिसरात दहा ते बारा कुटुंब कायमस्वरुपी वास्तव्यास आहेत. या परिसरातून गेलेल्या विजवाहक तारा गेल्या दिड वर्षांपासून अक्षरशः जमीनीवर लोंबकळत आहेत. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱयांचे दुर्लक्ष झाल्यामुळे ही घटना घडल्याचे स्थानिक रहिवाशीयांचे म्हणणे आहे. तसेच आज या तारांना चिकटून घोडी मरण पावली. भविष्यात या तारांच्या संपर्कात येवून मनुष्यहानी झाली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न स्थानिक रहिवाशीयांनी उपस्थित केला आहे. महावितरणने ताबडतोब या लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी देखील स्थानिकांनी केलेली आहे.