महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीतील देहविक्री व्यवसायाचा भंडाफोड; चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचाही समावेश - निघोज देहविक्री कारवाई

शिर्डी येथे सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाचा पोलिसांनी भंडाफोड केला. निघोज येथील हॉटेल साईधनमध्ये चौदा वर्षाच्या मुलीसह इतर तीन महिला व हॉटेल मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हॉटेल मालकाने अल्पवयीन मुलीला परराज्यातून आणले होते.

शिर्डीतील देहविक्री व्यवसायाचा भंडाफोड, आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश

By

Published : Nov 5, 2019, 2:16 PM IST

अहमदनगर -शिर्डी येथे सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाचा पोलिसांनी भंडाफोड केला. निघोज येथील हॉटेल साईधनमध्ये चौदा वर्षाच्या मुलीसह इतर तीन महिला व हॉटेल मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हॉटेल मालकाने अल्पवयीन मुलीला परराज्यातून आणले होते.

शिर्डीतील देहविक्री व्यवसायाचा भंडाफोड; चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचाही समावेश

हेही वाचा - भिवंडीत दोघा भावांना विवस्त्र केल्याचे चित्रीकरण, चौघांना अटक

देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना खबऱ्याने माहिती दिली. त्यानुसार हॉटेल साईधन येथे पोलिसांनी छापा टाकून दोन पीडित मुलींची सुटका केली. हॉटेल व्यवस्थापक विष्णु अर्जुन ठोंबरे (वय २२ वर्ष, रा. भायेगाव ता. वैजापूर) याच्यासह ग्राहक आणि पीडित महिला यांच्यातील दुवा असणारा गणेश सीताराम कानडे (वय ३५ वर्ष, रा. श्रीरामनगर शिर्डी ता. राहाता) तसेच त्याचे साथीदार सुनिल शिवाजी दुशिंग (वय २६ वर्ष, रा. विठ्ठलवाडी, शिर्डी ता. राहाता), किशोर भाउराज घारे उर्फ सागर बाबूराव जाधव (वय ३२ वर्ष, रा. शहापुर ता. कोपरगाव), सचिन रामभाऊ शेळके (रा.कोकमठाण ता. कोपरगाव), अक्षय भाऊसाहेब बगळे (रा.लक्ष्मीनगर, कोपरगाव), गोपिनाथ रावसाहेब हिंगे (रा. पिंपळवाडी, ता.राहाता यांना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपींवर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५, ७, ८ भादंवि कलम ३६६अ, बालन्याय अधिनियम २००० चे कलम २६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - औषधाने मुले होत असल्याचे सांगून 3 लाखांचा गंडा ; बोगस डॉक्टरसह तीनजण अटकेत

ABOUT THE AUTHOR

...view details