महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ashadhi Ekadashi 2023 : शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी एकादशीनिमित्ताने शिर्डीत भाविकांची गर्दी - शिर्डी साई बाबा दर्शन

राज्यभरात आषाढी एकादशीनिमित्ताने चैतन्याचे वातावरण आहे. पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. विठ्ठलाचे रुप असलेल्या साई बाबांच्या दर्शनासाठी आज भाविकांनी शिर्डीत गर्दी केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jun 29, 2023, 2:23 PM IST

शिर्डी(अहमदनगर) - महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मादियाळी पंढरपुरात दिसून येत आहे. तर दुसरीकडे साईबाबांना विठ्ठल स्वरुप माननाऱ्या भाविकांनी शिर्डीत दर्शनासाठी गर्दी केली आहे. शिर्डी माझे पंढरपूर ही आरती साईबाबा मंदिरात रोज गायली जाते. त्याचीच प्रचिती आज झालेल्या भाविकांच्या गर्दीने दिसून येत आहे.

शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी -साईबाबा हयातीत असताना साईबाबांचे परमभक्त दासगणू महाराज हे आषाढीच्या वारीला दरवर्षी पंढरपुरला विठ्ठल दर्शनासाठी जात असत. दासगणुंची एक आषाढी वारी चुकली होती. विठ्ठल दर्शनासाठी आतूर झालेल्या दासगणुंना साईबाबांनी विठ्ठलाच्या रुपात दर्शन दिले होते. तेव्हापासून दासगणू महाराजांनी शिर्डी माझे पंढरपूर अशी रचना केली होती. आजही साई मंदिरात बाबांच्या मंगलस्नानंतर हिच आरती म्हटली जाते. असंख्य भाविक बाबांनाच विठ्ठल स्वरुप मानून दर आषाढीस साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाऊन विठ्ठलरुपी साईंचे दर्शन घेऊन धन्य होतात.

बाबांना तुळशीची माळ - साईबाबा संस्थाननेही आषाढी एकादशीचे महत्व लक्षात घेऊन विठ्ठलाची प्रतिमा समाधीवर ठेऊन साईबाबांच्या मूर्तीला तुळशीची माळ आणि सुवर्ण आभुषणे चढवली आहेत. एरवी वर्षभर साईबाबांना फुलांची माळ घातली जाते मात्र, फक्त आषाढी एकादशीलाच बाबांना तुळशीची माळ घालण्यात येते. शिर्डीला येणाऱ्या भाविकांना असलेला उपवासाचा दिवस लक्षात घेऊन साई संस्थानच्या प्रसादालयात आज दिवसभर शाबुदान्याची खिचडी आणि झिरक हेच जेवण म्हणून देण्यात येते. आज आषाढी एकादशीच्या निम्मिताने रात्री भगवान विठ्ठल रुखमिणीची प्रतिमा ठेऊन साईंच्या रथाची मिरवणूक शिर्डी गावातून काढण्यात येते.

विठुरायाची नगरी दुमदुमली : विठ्ठल नामाच्या जयघोषाने विठुरायाची नगरी दुमदुमली आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त मोठी गर्दी झाली आहे. दहा ते बारा लाख भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडल्याने चंद्रभागेमध्ये स्नान करून भाविक नामदेव पायरीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करत आहेत.

हेही वाचा -

  1. Ashadhi Ekadashi 2023 : 'जय हरी विठ्ठल' म्हणत पंतप्रधानांनी आषाढी एकादशीच्या दिल्या मराठीत शुभेच्छा
  2. Ashadhi Ekadashi 2023: वारकऱ्यांवर मशिदीतून पुष्पवृष्टी करत मुस्लिम बांधवांनी घेतला वारीमध्ये सहभाग, हिंदू मुस्लिम धर्मियांच्या एकतेचे दर्शन
  3. Ashadhi Ekadashi 2023: बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे- मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे

ABOUT THE AUTHOR

...view details