महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Deepali sayyad : अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे दाऊद गॅंगशी संबंध; माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

अभिनेत्री दिपाली सय्यद ( Deepali sayyad ) भोसले यांचे अंडरवर्ल्ड दाऊद गॅंगशी आर्थिक संबंध ( connection with Dawood Gang ) असल्याचा गौप्यस्फोट त्यांचे माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे ( Deepali sayyad Former PA Bhausaheb Shinde ) यांनी केला आहे. भाऊसाहेब शिंदे यांनी परिषद घेत दिपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Bhausaheb Shinde secret explosion
भाऊसाहेब शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

By

Published : Dec 28, 2022, 9:14 PM IST

Updated : Dec 29, 2022, 10:25 AM IST

दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे बोलताना


मुंबई : सिनेअभिनेत्री आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या आणि आता बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेनेच्या वाटेवर असणाऱ्या दीपाली सय्यद ( Deepali sayyad ) भोसले यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम त्याचा भाऊ इकबाल कासकर आणि सलीम फ्रूटवाला यांच्या सोबत आर्थिक संबंध ( connection with Dawood Gang ) असल्याचा गौप्यस्फोट दिपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे ( Deepali sayyad Former PA Bhausaheb Shinde ) यांनी केला आहे.

पत्रकार परिषद घेत केला गौप्यस्फोट : दीपाली सय्यद भोसले सामाजिक फाउंडेशच्या माध्यमातून त्यांचे दाऊद गॅंगशी आर्थिक संबंध आहेत. दिपाली सय्यद अनेक वेळा दुबई जातात त्याची चौकशी केली तर त्यांचे पाकिस्तान कनेक्शन उघड होईल याचे सर्व पुरावे माझ्याकडे असून मला संरक्षण द्या मी राज्य शासन आणि पोलिसांना पुरावे देऊ शकतो असा आरोप दिपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे ( Bhausaheb Shinde secret explosion ) यांनी नगर मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.


शिंदे यांचे धक्कादायक आरोप : कुठल्याही क्षणी दीपाली सय्यद आणि राज्यपाल यांच्या कार्यकर्त्यांपासून माझा खून होऊ शकतो, असा धक्कादायक आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या उपस्थितीत कोविड योद्धा पुरस्कार प्रदान केले हा कार्यक्रम दिपाली सय्यद यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी सर्व कोविड योध्यांना पन्नास हजार रुपयांचे चेक देण्यात आले होते. मात्र हे चेक खोटे असून 50 लोकांना दिलेले चेक पैकी एकही चेक बँकेत जाऊन पैसे काढण्या लायक नसल्याने दिपाली सय्यद आणि राज्यपालांनी कोविड योध्याची फसवणूक केली आहे. तसेच सांगलीमध्ये कोविड काळात सामूहिक विवाहाचे आयोजन केले होते त्या ठिकाणी नाव नोंदणी न झाल्याने लग्न झालेले आणि ज्यांना मुले आहेत अशा दाम्पत्याची लग्न लावली गेली आहेत, या कार्यक्रमाला राज्यपालांनी उपस्थिती लावली होती.

राज ठाकरेंच्या हत्येचा कट? अयोध्या दौऱ्यात राज ठाकरेंची हत्या करायची होती त्याचा कट दिपाली सय्यद आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी आखला होता. त्यासाठी अनेक वेळा दिपाली सय्यद दिल्लीला गेल्या होत्या. दिपाली सय्यद यांनी जवळपास 17 ते 18 दिल्लीची वारी केलेली होती, असा गंभीर आरोपही भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.

दाऊद गॅंग पैसे पुरवते : माझ्या संरक्षणाची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी तर मी 30 जानेवारी रोजी अहमदनगरमध्ये पुन्हा पत्रकार परिषदेत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, इकबाल कासकर व सलीम फ्रूटवाला याच्याबरोबर दिपाली सय्यद यांचे जे आर्थिक व्यवहार आहेत. त्यांच्या माध्यमातून दिपाली सय्यद यांच्या ट्रस्टला हजारो कोटी रुपये पुरवले जातात. याचे पुरावे ऑडिओ सहित द्यायला तयार आहे असेही भाऊसाहेब शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Last Updated : Dec 29, 2022, 10:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details