अहमदनगर -अखिल भारतीय किसान सभा तसेच दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या दूध दरवाढीच्या प्रश्नावर राजस्तरीय आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला राज्यभर उत्तम प्रतिसाद लाभला. राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये तहसील कार्यालयांवर मोर्चे काढत तसेच तहसीलदारांना निवेदने देत आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती किसान सभेचे समन्वयक डॉ. अजीत नवले यांनी दिली.
लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचा बाऊ करत ज्या खाजगी व सहकारी दूध संघांनी, दूध खरेदीचे दर पाडले त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्या प्रमाणात किती दर कमी देण्यात आले. याबाबत सखोल चौकशी करा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खाजगी व सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करून त्यांनी केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
दूध दर आणि शेतकरी प्रश्नांवर आज करण्यात आलेल्या आंदोलनास राज्यभर चांगला प्रतिसाद - डॉ. अजित नवले - Dairy Farmers Protest in ahmednagar
अखिल भारतीय किसान सभा तसेच दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या दूध दरवाढीच्या प्रश्नावर राजस्तरीय आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला राज्यभर उत्तम प्रतिसाद लाभला, असल्याची माहिती किसान सभेचे समन्वयक डॉ. अजीत नवले यांनी दिली.
दूध दर आणि शेतकरी प्रश्नांवर आज करण्यात आलेल्या आंदोलनास राज्यभर चांगला प्रतिसाद - डॉ. अजित नवले