महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

गाईवर हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

By

Published : Aug 3, 2019, 4:54 PM IST

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

अहमदनगर- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे बिबट्याने गाईवर हल्ला केला. आज शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

संगमनेरमधील पठार भागात दिवसेंदिवस बिबट्याचा वावर वाढत चाललेला आहे. याच परिसरातील शेतकरी शिवराम आहेर यांच्या घरालगतच असलेल्या गोठ्यात गाय बांधून होती. आज सकाळी गाईंचा हंबरण्याचा मोठा आवाज आल्याने ते गोठ्यात गेले. यावेळी बिबट्याने एका गाईच्या मानेवर हल्ला करून जागेवरच ठार मारल्याचे दिसून आले.

आहेर यांनी घटनेची माहिती वनाधिकाऱ्याला दिली. माहिती मिळताच वनपरीमंडल अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप बहीरट व वनरक्षक एस. बी. धानापुणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.

गेल्या ४ दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याने कोंबड्या फस्त केल्याचा प्रकार घडला होता. आज पुन्हा गाईवर हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details