महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमधील 'हे' कोविड सेंटर बनले आहे चर्चेचा विषय, वाचा... - अहमदनगर कोविड सेंटर बातमी

संकट काळात अनेक सेवाभावी संस्थांनी पुढे येत कोविड केअर सेंटर्स सुरू करत आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी केला आहे. यात नगर जिल्ह्यात भाळवणी इथे आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरचे सध्या कौतुक होत आहे.

covid Center build by mla lanke in Ahmednagar has become topic of discussion
अहमदनगरमधील 'हे' कोविड सेंटर बनले आहे चर्चेचा विषय, वाचा...

By

Published : May 8, 2021, 7:35 PM IST

अहमदनगर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देश हतबल अवस्थेत दिसून येत आहे. सरकारी आरोग्य यंत्रणा किती तोकड्या आहेत. ही नकारात्मक बाजू पुढे येत असताना या संकट काळात अनेक सेवाभावी संस्थांनी पुढे येत कोविड केअर सेंटर्स सुरू करत आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी केला आहे. यात नगर जिल्ह्यात भाळवणी इथे आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरचे सध्या कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया

8 एकर जागेत 1100 खाटांचे सेंटर -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णसंख्येचा अंदाज आल्याने पारणेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार आरोग्य मंदिर नावाने सुरू केलेले भाळवणी इथले कोविड केअर सेंटर इथल्या सर्व सोयी-सुविधा आणि आनंदी वाटवरणा मुळे राज्यात चर्चेत आहे. 8 एकर जागेत तब्बल 1100 बेड्सच्या या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड्सची पुरेशी व्यवस्था आहे. विशेष म्हणजे स्वतः आमदार लंके स्वतः इथेच थांबून रुग्णांची सेवा करत आहेत. आतापर्यंत 1700 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण येथून उपचार घेऊन बरे होऊन गेले आहेत. सध्या 900 पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजन बेड्सची या ठिकाणी पुरेशी व्यवस्था आहे.

आनंदी वातावरणात रुग्ण विसरले कोरोनाला -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केवळ रुग्णसंख्याच वाढत नाही, तर मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे रुग्णांमध्ये भीती दिसून येत आहे, आमदार लंके यांनी हीच गोष्ट ओळखून या कोविड सेंटरवर जास्तीतजास्त आनंदी वातावरण कसे राहील, याकडे लक्ष दिले आहे. आम्ही रुग्णांना कोरोना विसरायला लावून त्यांच्यावर उपचार करतो त्यामुळे आमचे आतापर्यंत जवळपास 1800 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचे आमदार लंके सांगतात. योगा, ऑर्केस्ट्रा, प्रवचने, स्क्रीन टीव्ही, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि स्वतः आमदार लंके प्रत्येक रुग्णाकडे देत असलेले लक्ष त्यांनी उभा केलेल्या सोई-सुविधामुळे रुग्ण कोरोनाला विसरून आनंदी वातावरणात बरा होऊन घरी परतत आहे.

मदतीचे हजारो हाथ पुढे आले आणि कोविड सेंटर बनले -

स्वतः लंके रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासतात, त्यांच्या सोबत भजन-प्रवचनात उपस्थित राहतात. जेवण त्यांच्या सोबतच करतात. विशेष म्हणजे त्यांच्या या कोविड सेंटरच्या उपक्रमाला देश-विदेशातून भरभरून मदत येत आहे. मदतीचा ओघ पाहून हे कोविड सेंटर प्रति शिर्डी झाल्याचे आमदार लंके सांगतात. 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' यानुसार आमदार लंके आणि त्यांचे सहकारी या कोविड केअर सेंटरमध्ये काम करत आहेत. एक राजकीय नेताच न राहता या संकट काळात सामान्य जनतेसोबत राहून आमदार निलेश लंके करत असलेले समाजसेवेचे काम सध्या चर्चेचा विषय ठरले असून अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा - 'लोकांचे प्राण जाऊ शकतात, पण पंतप्रधानांची जीएसटी वसूली थांबत नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details