अहमदनगर - रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून सर्वानाच या संकटाचा सामना धैर्याने करावा लागेल, यासाठी सर्वजण अधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. विखे पाटील यांनी शिर्डी येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यावेळी कोविड रूग्णालयात बेडची संख्या वाढवणे तसेच सर्व सुविधांची पूर्तता करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
कोरोना संकटाचा सामना मोठ्या धैर्याने करावा लागणार - राधाकृष्ण विखे-पाटील
विखे पाटील यांनी शिर्डी येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यावेळी कोविड रूग्णालयात बेडची संख्या वाढवणे तसेच सर्व सुविधांची पूर्तता करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
राधाकृष्ण विखे पाटील
मागील वर्षभरात एकत्रितपणे केलेल्या उपाय योजनांमुळे कोरोना संकट रोखण्यात यश आले. परंतू या संकटाचे दुसरे संक्रमण सुरू झाल्यानंतर रुग्णांची वाढलेली संख्या ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे सर्वांनी रुग्णांच्या मदतीसाठी तत्पर राण्याचे आवाहन त्यांनी केली. तसेच संस्थानच्या रूग्णालयात अधिकचे बेड उपलब्धता करणे, ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटरची संख्या वाढविण्याचे निर्देश पाटील यांनी दिले.