अहमदनगर - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महानगर पालिका आयुक्तांना अत्याधुनिक कोविड केअर सेंटरबाबत सूचना केल्या होत्या. मात्र याबाबत मनपा आयुक्त उदासीन असल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसच्यावतीने गुरुवारी ठिय्या आंदोलन करण्यात आहे. आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलेला असून तोंडाला प्रतिकात्मक ऑक्सिजन मास्क लावून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह काही कार्यकर्ते हे आंदोलन केले.
'कोरोना संकट काळात आयुक्त साहेब आतातरी ऑक्सीजन द्या', दोनशे व्हेंटिलेटर खाटांसह एक हजार खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करा या मागणीसाठी हे आंदोलन अभिनव पद्धतीने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असून या भाजपाच्या सत्तेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक हे सध्या स्थायी समितीचे सभापती आहेत. यावर भाष्य करत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी महानगरपालिकेत भाजपा-राष्ट्रवादी युतीची सत्ता असल्याची उपहासात्मक टीका करत शहरातील सध्या कोरोना काळात झालेल्या भीषण परिस्थितीत महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर, तसेच शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे जबाबदार असल्याची टीका करत काळे यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे.
काँग्रेस करत असलेल्या आंदोलनाची कारणे -
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गेल्या महिन्यात 26 एप्रिल रोजी कोरोना आढावा बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांना महानगरपालिकेच्या वतीने 1 हजार ऑक्सिजन खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत सूचना केली होती. मात्र याबाबत अद्याप आयुक्तांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. या मागणीसाठी शहर काँग्रेसच्यावतीने दोन दिवसांपूर्वीच आयुक्तांच सोबत बैठक घेण्यात आली होती. मात्र यात आयुक्तांकडून कोणतीही सकारात्मक निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी हे आंदोलन सुरू केलेला आहे, तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपाच्या सहकार्यासह ऑक्सीजन बेड सेंटर निर्माण करण्याची जबाबदारी उचलण्यासाठी महानगरपालिकेला प्रस्ताव दिला होता. आधी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन देणाऱ्या महानगरपालिकेने याला नंतर खोडा घालून हात वर केले असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आरोप -