महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कांग्रेस-राष्ट्रवादीची आश्वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा - मुख्यमंत्री - CONGRESS

सुजय विखेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री विशेष वेळ देत आहे. दरम्यान, ज्यांचे तिकीट कापून सुजय विखेंना उमेदवारी देण्यात आली ते दिलीप गांधीसुध्दा या प्रचार सभांमध्ये सहभागी होताना दिसले.

कांग्रेस-राष्ट्रवादीची आश्वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा - मुख्यमंत्री

By

Published : Apr 21, 2019, 7:53 AM IST

अहमदनगर- काँग्रेसचे घोषणपत्र आणि राष्ट्रवादीचा जाहीरनामा म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे. त्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनतेने आपापल्या जबाबदारीवर ठरवावे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कर्जत येथे युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, आ.सुरेश धस आणि सुनील साळवे यांच्यासह सेना-भाजप-आरपीआय युतीचे अनेक नेते उपस्थित होते.

कांग्रेस-राष्ट्रवादीची आश्वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार चरमसीमेला गेलेला होता. मात्र, आमचे सरकार आल्यावर आम्ही जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आणि त्या जनतेपर्यंत पोहचवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर वचक बसवला. स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केल्याने जनता आज आमच्या पाठीशी आहे. मात्र, आता निवडणुकात काँग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेसची भाषणे म्हणजे एक करमणूक झाली आहे. यांची निम्मी भाषणे ही पंतप्रधान मोदींवर टीकेने भरलेली असतात. यांना जिथे-तिथे मोदी दिसतात. काहीजण तर रात्री मोदींमुळे घाबरून उठतात, अशी परस्थिती आहे. तर यांची निम्मी भाषणे करमणुकीची असतात. आता चॅनेलवर ज्या प्रमाणे एखाद्या कार्यक्रमाबाबत सूचना येते, की या कार्यक्रमातील पात्र, घटना या काल्पनिक असून वास्तविकतेशी याचा काहीही संबंध नाही, अशा सूचना द्यायची वेळ यांच्या भाषणाबाबत आली आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details