महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सर्वसामान्य नागपूरकरांनी केलेल्या अवस्थेमुळे पवारांना जळीस्थळी नागपूरकर गुंडच दिसतात' - मुख्यमंत्री VS शरद पवार

कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी कोपरगावमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Oct 11, 2019, 11:05 PM IST

अहमदनगर - नागपूर गुंडाचे शहर असल्याचे पवार म्हणतात. मात्र, एका सर्वासमान्य नागपूरकराने पवारांची अशी अवस्था केली की, त्यांना जळीस्थळी नागपूरकर गुंडच दिसायला लागले, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारसाठी मुख्यमंत्र्यांनी कोपरगावमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.

सर्वसामान्य नागपूरकरानी केलेल्या अवस्थेमुळे पवारांना जळीस्थळी नागपूरकर गुंडच दिसतात

हे वाचलं का? - अनर्थ टळला!, हेलिकॉप्टर अपघातातून बचावले मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्रात आगामी सरकार हे युतीच येणार आहे. पुढील ५ वर्षांच्या काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त आणि खड्डे मुक्त करण्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. निळवंडे धरणाला या सरकारने मोठा निधी दिला आहे. त्यामुळे कोपरगावचा पाणी प्रश्न सोडवला. प्रत्येक धरणात १५ टक्के पाणी पिण्यासाठी राखीव असते. त्यामधूनच कोपरगावला पाणी दिले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या पाण्यातील एकाही थेंबाला हात लावणार नसल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यानी दिली. मात्र, राष्ट्रवादीचे कोपरगावातील उमेदवार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

हे वाचलं का? -कोल्हापुरात राजू शेट्टींना मोठा धक्का; स्वाभिमानीच्या काटेंसह तिघांचा भाजपप्रवेश

नाशिक, नगर विरुद्ध मराठवाडा, असा पाण्यासाठी नेहमी होणारा संघर्ष किती दिवस होऊ द्यायचा? त्यामुळे आता 168 टीएमसी पाणी टनेलच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात आणणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच 25 टीएमसीचा आराखडा तयार झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details