महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चेन्नई येथून शिर्डीसाठी येणारे विमान उतरले थेट मुंबई विमानतळावर; वाचा, काय आहे कारण? - etv bharat marathi

कमी दृष्यमानतेच्या कारणास्तव चेन्नई येथून शिर्डीसाठी आलेले स्पाइस जेटचे विमान थेट मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले आहे. यामुळे चेन्नईहून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या 126 भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.

file photo
फाईल फोटो

By

Published : Oct 14, 2021, 3:33 AM IST

शिर्डी(अहमदनगर) - कमी दृष्यमानतेच्या कारणास्तव चेन्नई येथून शिर्डीसाठी आलेले स्पाइस जेटचे विमान थेट मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले आहे. यामुळे चेन्नईहून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या 126 भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. कमी दृष्यमानतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे व्यवस्थापक सुशील कुमार श्रीवास्तव यांनी दिली.

हेही वाचा -Maharashtra Corona Update - राज्यात 2219 नवे रुग्ण, तर 49 रुग्णांचा मृत्यू

  • विमानात होते 126 प्रवासी -

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले शिर्डी विमानतळ 10 ऑक्टोबरपासून सुरू झालेआहे. बुधवारी चेन्नईहून आलेले स्पाईस जेटचे विमान कमी दृष्यमानतेमुळे मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानात 126 प्रवासी होते. विमान लँडिंग करण्यासाठी पाच हजार मीटरपर्यंत दृष्यमानता आवश्यक असते. मात्र बुधवारी ढगाळ वातावरणामुळे शिर्डी विमानतळावर चार हजार मीटरपर्यंतच दृष्यमानता असल्याने बराच वेळ आकाशात घिरट्या घातल्यानंतर वैमानिकाने अखेर मुंबई विमानतळावर विमान लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

  • साईभक्तांना मनस्ताप -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरात ऑनलाइन पास बुकिंग केल्यानंतरच भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे. विमान मुंबईला लँडिंग करावे लागल्याने या विमानाने आलेल्या साईभक्तांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. आँनलाईन दर्शनासाठी बुधवारची वेळ निर्धारित झालेल्या अनेक साईभक्तांना साईबाबांच्या दर्शनापासून वंचित राहावे लागले. तर काहींवर पुन्हा पास काढण्याची नामुष्की ओढवली आहे. शिर्डीहून चेन्नईसाठी तिकीट बूक केलेल्या प्रवाशांना देखील मोठा मनस्ताप सहन करत विमानतळावरून माघारी परतावे लागले. यापूर्वी देखील अनेकदा शिर्डी विमानतळावर कमी दृष्यमानतेमुळे विमानसेवेत बाधा आल्याच्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा -Cruise Drug Case : आर्यनला 'जेल की बेल'?; आज न्यायालय देणार निकाल

ABOUT THE AUTHOR

...view details