अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खांडगाव देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 लााख रुपयांचा धनादेश देण्यात आला. खांडगांव देवस्थान ट्रस्टच्या वतीने एक लाख रूपये मदतीचा धनादेश उपविभागीय अधिकार शशिकांत मंगरुळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
खांडगांव देवस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सदर 1 लाख रुपयांचा धनादेश यावेळी देवस्थाचे अध्यक्ष लहानभाऊ गुंजाळ,विश्वस्त अॅड.मधुकर गुंजाळ,कारखाना संचालक रमेश गुंजाळ ,विश्वस्त विठ्ठलअप्पा गुंजाळ,अॅड.विठ्ठल गुंजाळ सचिव प्राचार्य अशोक गुंजाळ आदि मान्यवर उपस्थित होते.
खांडगाव देवस्थान हे तालुक्यातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असून येथे जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेर अनेक भाविक येत असतात.या देवस्थानचा परिसर हा स्वच्छ व टापटीप असल्यामुळे भाविकांची येथे नियमित वर्दळ राहिली आहे. सातत्याने सामाजिक उपक्रमात खांडगांव देवस्थान अग्रेसर राहिले असून सामुदायिक विवाह सोहळा याचबरोबर अनेक विविध कार्यात सहभाग घेतला आहे.
कोरणा काळात मोठे संकट आले असताना हे देवस्थान मदतीला धावले असून एक लाख रुपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन काळामध्ये अनेक मजुरांच्या जेवनाची व्यवस्थाही मंदीर समितीच्या वतीने करण्यात आली आहे.