शिर्डी -शहरातील विवेकानंद नगर परिसरात राहणाऱ्या विजय भाटे यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याच्या वादातून विजयच्या पत्नीच्या मानलेल्या भावाने बहिणीवरच ब्लेडने वार केला. त्यानंतर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जखमी झालेल्या दोघांवर शिर्डीत साई संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेच्या पतीने शिर्डी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार पवन परदेशी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
शिर्डीतील स्वामी विवेकानंद नगरात राहणाऱ्या विजय भाटे यांच्या लग्नाला बारा वर्षे झाली. त्याचा आनंद ते कुटुंबीयांसमवेत साजरा करत होते. तितक्यात विजयच्या पत्नीने भाऊ मानलेला पवन परदेशीने केक कापू नका, फोटो काढू नका, असे धमकावकत गोंधळ घातला. यावेळी विजयने त्यास असे का करू नये विचारले व त्या़ंच्यात वाद झाला. दरम्यान, पवनने आपल्याबरोबर आणलेल्या ब्लेडने विजयच्या पत्नीच्या गळ्याव वार केले. त्यानंतर उपस्थितांना धक्काच बसला. याच दरम्यान पवननेही स्वत: वर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.