महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दूध दरवाढीसाठी पाथर्डी मध्ये भाजपाचे आंदोलन; आ.मोनिका राजळेंच्या नेतृत्वात रास्ता रोको - मोनिका राजळे न्यूज

दूध दरवाढीसाठी पाथर्डी मध्ये भाजपाने आंदोलन केले. भाजपा आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. भाजपाचे मित्रपक्ष देखील यात सहभागी झाले.

Bjp protest for milk rates
भाजपचे दूध दरवाढ आंदोलन

By

Published : Aug 2, 2020, 9:50 AM IST

पाथर्डी(अहमदनगर)-भाजपा आणि मित्र पक्षांतर्फे शनिवारी राज्यभरात दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. दूध दरवाढ मिळावी व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भाजपा व मित्र पक्षांच्यावतीने आ. मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग वरील प्रांत कार्यालयासमोर रस्ता रोको व मोफत दूध वाटप आंदोलन करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध पक्ष,संघटना दूध दरवाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. भाजपाने शनिवारी राज्यभरात दूध दरवाढीसाठी आंदोलन केले. पाथर्डी तालुक्यात आ. मोनिका राजळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

भाजपातर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, जि. प. सदस्य राहुल राजळे, नगराध्यक्ष डाॅ. मृत्युंजय गर्जे, सभापती सुनिता दौंड, उपसभापती मनिषा वायकर, विष्णूपंत अकोलकर, अभय आव्हाड, सुनिल ओहोळ, किसान मोर्चाचे बाळासाहेब ढाकणे, काशिताई गोल्हार, मंगल कोकाटे, जेष्ठ नेते अशोक चोरमले, चारुदत्त वाघ, अनिल बोरुडे, प्रविण राजगुरु, काका भांडकर यांच्यासह दूध उत्पादक व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details