महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मी प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर फिरतोय ते मात्र मंत्री असून गल्लीबोळात फिरतायत' - बाळासाहेब थोरात सभा राहता

राज्यात काँग्रेसचे अस्तित्व राहणार नाही, असे बोलणाऱ्यांनी माजी विरोधी पक्षनेत्यांची अवस्था काय झाली आहे, हे पहावे. मी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून राज्यभर फिरत आहे. ते मात्र जिल्ह्यातच गल्लीबोळात फिरतात, अशी टिका बाळासाहेब थोरात यांनी विखेंचे नाव न घेता केली.

बाळासाहेब थोरात

By

Published : Oct 18, 2019, 5:28 PM IST

अहमदनगर -जिल्ह्याच्या राजराकारणातील विखे आणि थोरात यांच्यातील स्पर्धा जगजाहीर आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप्रवेशानंतर हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. अहमदनगरमध्ये राहता येथील एका प्रचार सभेत थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तिरकस टीका केली आहे. 'मी काँग्रेस पक्षाचा राज्याचा प्रदेश अध्यक्ष आहे आणि राज्यभर फिरत आहे. ते मात्र जिल्ह्यातच गल्लीबोळात फिरतात', अशी खरमरीत टिका थोरात यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव न घेता राहाता येथील प्रचार सभेत केली आहे.

राहता येथील सभेत बोलताना बाळासाहेब थोरात

हेही वाचा... संगमनेर मतदारसंघ : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गडाला खिंडार पाडण्यास विरोधक एकवटले

शिर्डी मतदारसंघाचा मी मतदार...

जोर्वे गावातच माझे मतदान आहे. विरोधी पक्षनेते यांनी साडेचार वर्षे भाजपला मोठा त्रास दिला आता त्यांचे मित्र झाले, असा टोला थोरात यांनी यावेळी लगावला. तसेच काँग्रेसने या वेळी विखेंना भक्कम उमेदवार दिलाय असेही सांगितले. माझ्या मतदारसंघात येऊन हे पिता-पुत्र शिर्डी मतदारसंघासारखा विकास संमगनेरात करायचा आहे, असे बोलतात. मात्र इथे शिर्डीचा विकास रखडलाय, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा... महाराष्ट्राच्या प्रचार मैदानातून सोनियांची माघार?

...तर त्यांचे अध्यक्ष पद दिवाळी नंतर राहणार नाही

काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटिल यांच्या पत्नी शालिनी विखे यांच्याकड़े अजूनही काँग्रेस पक्षाची सत्ता असलेले जिल्हा परिषद अध्यक्ष पद आहे. याबद्दल बोलताना थोरात यांनी, विखेंचे नाव न घेता दिवाळी नंतर ते पदही राहणार नसल्याची बोलले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details