महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dhirendra Shastri: अखेर धीरेंद्र शास्त्री यांना झुकावेच लागले; ट्विट करून साई भक्तांची मागितली माफी - शिर्डी साईबाबा

शिर्डी साईबाबांचा भक्तांचा आणि ग्रामस्थांचा रोष पाहून धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अखेर साईबाबा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे. बागेश्वर धामकडून याबाबत अधिकृत माफीनामा जाहीर करण्यात आला आहे. तर बागेश्वर बाबा यांनी माफी मागण्याची ही दुसरी वेळ आहे.

Dhirendra Shastri
धीरेंद्र शास्त्री

By

Published : Apr 6, 2023, 7:18 AM IST

Updated : Apr 6, 2023, 12:58 PM IST

धीरेंद्र शास्त्री यांनी साई भक्तांची मागितली माफी

अहमदनगर ( शिर्डी ): ट्विट करत बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबा बदल केलेल्या वक्तव्या प्रकरणी माफी मागितली आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी एका कार्यक्रमात साईबाबांना विषय वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. त्यामुळे शास्त्री यांनी ट्विट करून नाही तर थेट कार्यक्रमा दरम्यानच साईबाबांची आणि भक्तांची माफी मागावी अशी मागणी यावेळी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी केली आहे.



ग्रामस्थांनी व्यक्त केल्या भावना: बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी जबलपूर येथील एका कार्यक्रमा दरम्यान, साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात, पण देव असू शकत नाही असे वादग्रस्त विधान केले होते. धीरेंद्र शास्त्री यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांसह देशभरातील साई भक्तांनासह शिर्डी ग्रामस्थांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. दरम्यान, ग्रामस्थांनी शिर्डीत मोर्चा काढत धीरेंद्र शास्त्री यांचा निषेध व्यक्त करत साईबाबा हेच आमचे देव असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या आहे. एका विशिष्ट विचारसरणीचे लोक साईबाबांबद्दल सारखेच अशी विधाने करतात. साईबाबा देव आहे की नाही. यासाठी धीरेंद्र शास्त्री यांचे प्रमाणपत्र आवश्यक नाही. धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये यावे. त्यांची अक्कल जागृत होईल. अशी भावनाही शिर्डीतील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.



कार्यक्रमात साई भक्तांची माफी मागावी :दरम्यान ,भाविकांचा रोष पाहुन आज अखेर धीरेंद्र शास्त्री यांच्या बागेश्वर धामच्या ट्विटर अकाउंटवर बाबांचा माफीनामा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी एका कार्यक्रमात साईबाबांना विषय वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. त्यामुळे शास्त्री यांनी ट्विट करून नाही, तर थेट कार्यक्रमा दरम्यानच साई भक्तांची माफी मागावी, नाही तर थेट शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेवुन साईबाबांची आणि भाविकांची माफी मागावी अशी मागणी यावेळी साईबाबांचा दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून करण्यात आली.





हेही वाचा:Complaint Against Bageshwar Dham साईबाबांवरील वादग्रस्त वक्तव्य भोवणार बागेश्वर महाराजांविरोधात तक्रार दाखल

Last Updated : Apr 6, 2023, 12:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details