महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एटीएम फोडून तब्बल 20 लाखाची रोकड लंपास; शिर्डीजवळील घटना - अहमदनगर एटीएम फोडले

चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून रक्कम पसार केल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले असून लोणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर हे संयुक्तिकरित्या घटनेचा तपास करत आहे.

ATM brocken by thief and about twenty lack rupees robbed
एटीएम फोडून तब्बल 20 लाख रुपये लंपास; शिर्डीजवळील घटना

By

Published : Jan 5, 2020, 9:45 PM IST

अहमदनगर - राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील लोणी रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन फोडल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास चोरांनी मशीन फोडून तब्बल 20 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

हेही वाचा - सराईत गुन्हेगार पाच तलवारीसह अटकेत; एक तलवार चांदीची

पोलिसांनी अहमदनगर येथील श्वानपथक तसेच ठसे तज्ञांचे पाचारण घटनास्थळी करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दिली. एटीएम मशीन फोडण्याचा आवाज आल्याने शेजारील लोक जागे झाले त्यांनी गावातील इतर लोकांना आणि पोलीस ठाण्यात मोबाईलद्वारे संपर्क केला. यावेळी काही लोकांनी चोरांचा पाटला देखील करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमधून चोर लोणीच्या दिशेने पळून गेले.

लोणीसह बाबळेश्वर परिसरात घरफोडी, महिलांचे दागिने पळवणे, दुचाकी चोरी अशा विविध घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या काही महिन्यातील घडलेल्या गुन्ह्यांची अद्याप उकल झालेली नव्हती, त्यात भर म्हणून चौकातील एटीएम मशीनच चोरट्यांनी लांबवल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. लोणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर हे संयुक्तिकरित्या घटनेचा तपास करत आहेत.

हेही वाचा - विद्याविहारमध्ये आढळला महिलेचा धडापासून शीर व पाय कापलेला मृतदेह

ABOUT THE AUTHOR

...view details