महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shirdi Parikrama : शिर्डी परिक्रमा उत्सवाच्या तारखेची घोषणा, 'या' तारखेला होणार परिक्रमा - शिर्डी परिक्रमा उत्सवाच्या तरखेची घोषणा

शिर्डीच्या साईबाबांनी (Sai Baba Mandir) आपल्या हयातीत ज्या मार्गाने प्रवास केला होता. त्या उर्जामय वाटेवर भाविकांनी देखिल (Announcement of Shirdi Parikrama festival schedule) भम्रण करावे, यासाठी 13 फेब्रुवारी पासुन दरवर्षी शिर्डी परिक्रमाला (Parikrama to be held on 13th February every year) सुरुवात होणार आहे.

Shirdi Parikrama
शिर्डी परिक्रमा

By

Published : Nov 19, 2022, 3:13 PM IST

अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबांनी (Sai Baba Mandir) आपल्या हयातीत ज्या मार्गाने प्रवास केला होता. त्या उर्जामय वाटेवर भाविकांनी देखिल भम्रण करावे, अशी संकल्पना घेवून शिर्डी परिक्रमा या महोत्सवाचे शिर्डी ग्रामस्थ व ग्रीन एन क्लीन शिर्डी यांच्यावतीने आयोजत (Announcement of Shirdi Parikrama festival schedule) करण्यात आले आहे. या शिर्डी परिक्रमा तारखेची आज घोषणा करण्यात आली. दरवर्षी 13 फेब्रुवारी या तारखेला शिर्डी परिक्रमाला सुरुवात (Parikrama to be held on 13th February every year) होणार आहे.

प्रतिक्रिया देतांना भाग्यश्री बानायत व मनीलाल पटेल




चौदा किलो मिटरच्या शिर्डी प्ररिक्रमेचा घोषणा समारोह शिर्डीत नुकताच पार पडला. साईसंस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते परिक्रमेच्या तारखेचा शुभारंभ करण्यात आला. साई व्दारकामाई समोर हा सोहळा पार पडला असून; यापुढे शिरडी साई परिक्रमा दरवर्षी 13 फेब्रुवारी या दिवशी होणार आहे. शिर्डीतील ग्रीन एन क्लिन शिर्डी आणि साईभक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या परिक्रमेच आयोजन केले जात आहे. त्यासाठी हजारो भाविक येवून शिरडी क्षेत्राची चौदा किमीची पायी परिक्रमा करणार आहे. 2023 पासून ह्या परिक्रमेची तारीख निश्चित करण्यात आली असून; यापुढे शिरडी साई परिक्रमा 13 फेब्रुवारी या दिवशीच होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात भाविकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन साईसंस्थानच्या सीईओ बानायत आणि ग्रीन एन क्लिन शिर्डीच्या वतीने करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details