महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

.. तर 'अंनिस' दाखल करणार इंदोरीकरांविरोधात तक्रार - PCPNDT ACT

इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या क्लिपची लिंक सायबर पोलिसांना मिळत नसेल आणि त्या आधारे पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग करूनही समितीचे सचिव जर आपली जबाबदारी टाळत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांच्याविरुद्ध दाखल करणार आहे.

indorikar maharaJ
अॅड. रंजना गवांदे, इंदोरीकर महाराज

By

Published : Feb 25, 2020, 7:25 PM IST

Updated : Feb 25, 2020, 11:37 PM IST

अहमदनगर -सायबर सेलच्या अहवालाचा आधार घेऊन अहमदनगर पीसीपीएनडीटी समितीने वादग्रस्त कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना तुर्तास दिल्यानंतर पीसीपीएनडीटी सचिव आपली जबाबदारी टाळत असल्याचा आरोप अंंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

.. तर 'अंनिस' दाखल करणार इंदोरीकरांविरोधात तक्रार

हेही वाचा -इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा; तुर्तास तरी पीसीपीएनडीटी समितीचा कारवाईसाठी नकार

नुकतेच अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी (लिंग निवडीस प्रतिबंध समिती) समितीने सायबर सेलकडे इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी पत्र दिले होते. अहमदनगर सायबर सेलकडून याबाबत समितीला अहवाल देण्यात आला होता. वादग्रस्त विधान असलेला व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणी कमी झाल्याचे म्हटले जात आहे.

इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या क्लिपची लिंक सायबर पोलिसांना मिळत नसेल आणि त्या आधारे पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग करूनही समितीचे सचिव जर आपली जबाबदारी टाळत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्वतः या प्रकरणात तक्रारदार होऊन इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती अंनिसच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी दिली आहे. अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक आणि पीसीपीडीटी समितीचे सचिव डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सायबर सेल पोलिसांना वादग्रस्त वक्तव्याच्या क्लिपची लिंक शोधण्यास सांगितली होती. मात्र, संबंधित लिंक युट्युब वर सापडत नसल्याचा अहवाल सायबर पोलिसांनी दिल्याने इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, आता अंनिसने हे प्रकरण तडीस नेण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, अहमदनगरच्या ज्या सायबर पोलीस ठाण्याला वादग्रस्त क्लिपची लिंक सापडत नाही, त्या सेलच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना कोणताही खुलासा देण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी मागितल्या माहितीची चौकशी करुन वरिष्ठांना अहवाल पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग करणाऱ्या वक्तव्याची क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली असताना समिती बोटचेपे धोरण का घेत आहे? असा प्रश्न आता अंनिससह सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे.

हेही वाचा -'तो मी नव्हेच', इंदोरीकर महाराजांचा पीसीपीएनडिटी समितीसमोर खुलासा

Last Updated : Feb 25, 2020, 11:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details