महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सध्या राळेगणसिद्धीला येऊ नका; अण्णा हजारेंचा चाहत्यांना सल्ला - राळेगणसिद्धी ग्रामविकास

राळेगणसिद्धी येथे ग्रामविकासाचे कार्य पाहण्यासाठी देशातील विविध राज्यातून त्याचप्रमाणे विदेशातूनही पर्यटक येतात. सध्या जगभर कोरोना हा संसर्गजन्य रोग पसरतो आहे. कोरोना हा जीवघेणा रोग असल्याने, त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी कोणीही राळेगणसिद्धीला भेट देऊ नये, अशी विनंती अण्णा हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकात केली.

Anna Hazare
अण्णा हजारे

By

Published : Mar 14, 2020, 8:35 AM IST

अहमदनगर - जगभर घबराट निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूचे अहमदनगरसह राज्यात 19 रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या राळेगणसिद्धीला भेट देण्यास येऊ नये, असा विनंतीवजा सल्ला समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. याबाबत शुक्रवारी अण्णांनी एक प्रसिद्धी पत्रक काढले.

अण्णा हजारेंचा चाहत्यांना सल्ला

राळेगणसिद्धी येथे ग्रामविकासाचे कार्य पाहण्यासाठी देशातील विविध राज्यातून त्याचप्रमाणे विदेशातूनही पर्यटक येतात. सध्या जगभर कोरोना हा संसर्गजन्य रोग पसरतो आहे. कोरोना हा जीवघेणा रोग असल्याने, त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी कोणीही राळेगणसिद्धीला भेट देऊ नये, अशी विनंती अण्णा हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकात केली आहे.

हेही वाचा -COVID-19 LIVE : भारतात दुसरा बळी; वाचा कोरोनासंबंधीच्या सर्व बातम्या एका क्लिकवर...

आजपर्यंत राळेगणसिद्धी येथे 16 लाखांपेक्षा ज्यास्त पर्यटक देश-विदेशातून आलेले आहेत. गाव, परिसर, राज्य व देशातील लोकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने खबरदारी म्हणून पर्यटकांनी कोरोना रोग तीव्रता कमी होईपर्यंत राळेगणसिद्धीला येण्याचे टाळावे, असेही अण्णा म्हणाले. नागरिकांनी न घाबरता या रोगाला धैर्याने तोंड देण्यासाठी जे जे पथ्य सांभाळावे लागतात ते सांभाळावे, असे आवाहन त्यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details