अहमदनगर- निवडणूक येते आणि जाते, राहते ती कटुता, म्हणून आम्ही गेली 35 वर्षे बिनविरोध निवडणुकीवर भर दिला. मात्र, यंदा निवडणूक झाली. विजयी उमेदवारांनी पराभूत उमेदवारांना सोबत घेऊन आता काम केले पाहिजे. म्हणजे गावाचा विकास हा साध्य होईल, असे मत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. गावावरून देशाची परीक्षा होते. त्यामुळे गाव सुरक्षित राहिला पाहिजे. त्यामुळे हेवेदावे करुन उपयोग नाही, असे मत अण्णांनी व्यक्त केले.
पराभूत उमेदवारांना सोबत घेतल्या शिवाय गावाचा विकास होणार नाही - अण्णा हजारे - अहमदनगर जिल्हा बातमी
अण्णा यांचे गाव असलेल्या राळेगणसिद्धीमध्ये 35 वर्षांत पहिल्यांदाच निवडणूक झाली. यामध्ये बिनविरोध करण्याच्या पक्षात असलेल्या गटाचा विजय झाला आहे. विजयी उमेदवारांनी पराभूत उमेदवारांना सोबत घेऊन आता काम केले पाहिजे. म्हणजे गावाचा विकास हा साध्य होईल, असे मत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.
अण्णांच्या राळेगणसिद्धीमध्ये यंदाचा अपवाद वगळता गेल्या 35 वर्षात निवडणूक झाली नाही. गावात दोन गट असले तरी ते अण्णांच्या ऐकण्यातील आहेत. त्यांनी अण्णांना मान देत सामंजस्याने बिनविरोध निवडणुका पार पाडल्या होत्या. मात्र, यंदा गावात तिसरा गट पुढे आला आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरले. साहजिकच बिनविरोध निवडणूक अपेक्षित असताना दोन्ही गटांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली. निर्णय आहे तोच अपेक्षित आला. बिनविरोध निवडणुकीला अनुकूल असलेला औटी-मापारी यांचा ग्रामविकास पॅनल निवडून आला आणि निवडणुकीचा आग्रह धरलेल्या गटाला एकही जागा मिळाली नाही. सर्व नऊ जागांवर औटी-मापारी या अण्णांचा आदेश पाळणाऱ्या गटाला राळेगणसिद्धी परिवाराने बहुमताने निवडून देत एका अर्थाने गाव अण्णांच्या मागे असल्याचे स्पष्ट केले.