अहमदनगर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दोन दिवसांपूर्वीच आपले सात दिवस सुरू असलेले उपोषण आंदोलन राज्य आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर थांबवले. मात्र, आश्वासन पूर्ण नाही केले तर आचारसंहिता लागताच उपोषण करणार, असा इशारा अण्णांनी दिला आहे.
... तर आचारसंहिता लागताच उपोषण करणार, अण्णांचा सरकारला इशारा
केंद्रीय कृषी विभागाकडून अण्णांना अपेक्षित असलेला लेखी स्वरुपात आश्वासनांचे पत्र अजूनही मिळालेले नाही. हे पत्र उपोषण सोडताना रात्रीच मिळणे अपेक्षित होते.
केंद्रीय कृषी विभागाकडून अण्णांना अपेक्षित असलेला लेखी स्वरुपात आश्वासनांचे पत्र अजूनही मिळालेले नाही. हे पत्र उपोषण सोडताना रात्रीच मिळणे अपेक्षित होते. मात्र दोन दिवस उलटल्यानंतरही केंद्रीय कृषी विभागाने अधिकृतपणे पत्र पाठवलेले नाही. त्यामुळे अण्णांनी याबद्दल नाराजी व्यक्त करताना जनतेप्रमाणे मलाही शंका असल्याचे म्हटले आहे.
आणखी दोन दिवस सरकारच्या पत्राची वाट पाहणार असून, त्या नंतर सरकारचा निषेध म्हणून मौन उपोषण सुरू करणार आहे. त्याचबरोबर लोकपाल आणि लोकायुक्त याबाबत सरकारने दिलेली आश्वासने आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण न केल्यास आचारसंहिता लागताच पुन्हा एकदा उपोषण आंदोलन सुरू करेल. त्या काळात सरकारचीच गोची होईल. कारण आचारसंहितेच्या काळात उपोषण आंदोलन सुरू केल्यास सरकारला माझ्याशी बोलणी करता येणार नाही आणि त्यामुळे माझ्या आंदोलनाचा मार्ग मोकळा राहील. जनतेत यामुळे एक प्रकारे जनजागृती मोठ्या प्रमाणात होईल, याची नोंद सरकारने घ्यावी, असा स्पष्ट इशारा अण्णांनी दिला आहे.