शिर्डी(अहमदनगर)- परप्रांतीय मजूर पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत. तर काही मजूर हे शासनाने सुरू केलेल्या रेल्वेतून गावी जात आहेत. उत्तर प्रदेशला अहमदनगरहून रेल्वेने जाणाऱ्या संगमनेर येथील चारशेच्यावर मजुरांना आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या़ंच्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या बसेसने अहमदनगरला रवाना करण्यात आले.
उत्तरप्रदेशला जाण्यासाठी संगमनेरमधील 400 परप्रांतीयांना अमृतवाहिनीच्या बसने नगरपर्यंत केले रवाना - amrutvahini sangmner
उत्तरप्रदेशला जाण्यासाठी संगमनेरमधील 400 परप्रांतीयांना अमृतवाहिनीच्या बसने नगर रेल्वे स्टेशनपर्यंत रवाना करण्यात आले.
migrants workers
कोपरगाव तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावरून काही मजूर पायी जात होते. या सर्व मजुरांना कोपरगाव तालुक्यातील हद्दीतून बसमध्ये बसवून नाशिक जिल्ह्यातील सीमेवर सोडण्यात आले. येथेही त्यांना अन्न दिले जात आहे. यासाठी कोपरगावातील कोल्हे यांची संजीवनी संस्था आणि काळे यांच्यावतीने यासाठी पुढाकार घेण्यात आला.