अहमदनगर - नागपूरचं बोचकं परत नागपूरला पाठवा, अन् महाआघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आपल्याकडे शाळेत नापास झाले की बापाला बोलावले जाते. तशीच अवस्था सध्या मुख्यमंत्र्यांची झाली आहे, त्यांच्या नाकर्तेपणामुळेच मोदी-शाह महाराष्ट्रात येत असल्याचा टोमणा कोल्हेंनी लगावला.
अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला हेही वाचा - 'म्हशीपेक्षा रेडकू मोठा कसा?', शिखर बँकप्रकरणी अजित पवारांची भाजपवर टीका
हेही वाचा - 'दहा रुपयांची भीक टाकण्याइतका महाराष्ट्र भिकारी झाला नाही'
कर्जत - जामखेडच्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी येथे आलेले पार्सल परत पाठवा, अशी रोहीत पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले. कर्ज जामखेड मतदारसंघाचे उमेदवार रोहीत यांच्या प्रचारार्थ आयोजीत मिरजगाव येथील सभेत कोल्हे बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यासह सरकारवर जोरदार निशाणा साधला. गेल्या ५ वर्षांची स्वतःचीच कारकीर्द पाहून मुख्यमंत्र्यांना प्रश्न पडला असेल, की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे. त्यामुळे नागपूरचे बोचकं परत नागपूरला पाठवा, अशी खोचक टीका कोल्हेंनी केली.
पदाचा आदर मात्र, गडी कसाच पैलवान दिसत नाही
मुख्यमंत्री पदाचा आदर आहे. मात्र, फडणवीस हे पुढून मागून कसेही बघितले तर पैलवान दिसत नसल्याचे वक्तव्य अमोल कोल्हेंनी केले. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र, आमच्यासोबत लढायला कोणीच नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. या वक्तव्याला कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले.