महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amit Shah On DCC Bank Scam : 'हजारो कोंटींचे घोटाळे कसे झाले?, रिझर्व्ह बॅंकेने केले का ?' - अमित शाह - Amit Shah targets Maharashtra Government

देशातील पहिली सहकार परिषद महाराष्ट्रात झाली. या सहकार परिषदेत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी ठाकरे सरकारवर जोरदार (Amit Shah targets Maharashtra Government) हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बँक आदर्श मानल्या जात होत्या. आज फक्त तीन बँका आहेत. हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला? रिझर्व्ह बँकेने केले का? असा सवाल अमित शाह यांनी केला.

Amit Shah
Amit Shah

By

Published : Dec 18, 2021, 4:56 PM IST

Updated : Dec 18, 2021, 6:51 PM IST

अहमदनगर -अहमदगरमध्ये देशातील पहिली सहकार परिषद (First co-operative conference in the country) पार पडली. या सहकार परिषदेत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह उपस्थित होते. या सहकार परिषदेत अमित शाह (Union Minister Amit Shah) यांनी भाषण करताना ठाकरे सरकारवर जोरदार (Amit Shah targets Maharashtra Government) निशाणा साधला. आज सहकार क्षेत्र अडचणीत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बँक आदर्श मानल्या जात होत्या. आज फक्त तीन बँका आहेत. हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला? रिझर्व्ह बँकेने केले का? असा सवाल अमित शाह यांनी केला.

या सहकार परिषदेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. (Amit Shah targets opposition over corruption in district bank)

अमित शहायांनी म्हटले, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा बँकेला आदर्श मानले जात होते. पण आज स्थिती काय झाली आहे, केवळ तीनच बँका सुरुळीत सुरू आहेत. काय झालं? हजारो कोंटींचे घोटाळे (Amit Shah on corruption in district bank) कसे झाले, हे घोटाळे काय रिझर्व्ह बॅंकेने केले का ? तर अजिबात नाही. मी एवढ निश्चित सांगतो कि सहकारासाठी जी काही मदत लागेल ती सर्व मदत आम्ही करणार आहोत.

सहकार विद्यापीठ बनवणार -

अमित शाह म्हणाले की, भारत सरकार एकाही साखर कारखान्याचे खासगीकरण करणार नाही. मी सहकार मंत्री झाल्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, हे सहकार तोडण्यास आले मात्र मी सांगू इच्छितो कि मी सहकार जोडण्यास आलो आहे. मला सहकार विभागाविषयी कोणीही सल्ले देण्याचे काम करू नये. आम्ही बँका वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि करत राहणार. सध्या यासंदर्भात कोणतीही समिती नेमणार नाही. आम्ही लवकरच सहकार विद्यापीठ बनवणार आहोत.

प्रवरानगरची भूमी काशी जितकीच पवित्र -

प्रवरानगरची भूमी काशी जितकीच पवित्र आहे. या भूमीत सहकाराची पायाभरणी करण्याचं काम झालं. देशात सहकाराच्या क्षेत्राला काम करणाऱ्या व्यक्तींनी प्रवरानगरला येऊन कपाळाला इथली माती लावावी, असं अमित शाह म्हणाले.

जिल्हा बँकामध्ये हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला? अमित शाह यांचा सवाल

नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलं. आज सहकार क्षेत्र अडचणीत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बँक आदर्श मानल्या जात होत्या. आज फक्त तीन बँका आहेत. हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला? रिझर्व्ह बँकेने केले का? असा सवाल अमित शाह (Union Minister Amit Shah)यांनी केला. सहकारी बँकांच्या पाठिशी नरेंद्र मोदी आहेत, असे अमित शाह म्हणाले.

देंवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका -

देशातील पहिल्या सहकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी अनेक मुद्दे मांडले. एमएसपी लावल्याने साखर कारखाने तरले आहेत. अमित शाह हे सहकारी चळवळीतून तायर झालेले नेते आहेत. त्यांनीच इथेनॉलसंदर्भात निर्णय घेतला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच सहकार चळवळ मोडीत निघाली असे म्हणत आहेत तेच सहकारी साखर कारखाने विकत घेत आहेत. अशी अप्रत्यक्ष टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.

कार्यक्रमात बोलताना अमित शाह

मोदींच्या सबका साथ सबका विकास या मंत्रातच सहकाराचा विचार -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या सबका साथ सबका विकास या मंत्रातच सहकाराचा विचार अंतर्भूत झाला आहे. या चळवळीतील दोष दुर करुन, या चळवळीला अधिक मजबुत करण्‍यासाठी केंद्र सरकार पाऊल टाकत आहे. आम्‍ही सहकार मोडायला आलो नाहीत तर जोडायला आलो आहोत. राजकारणाच्‍या पलिकडे जावून या चळवळीकडे पाहा, उगाच आम्‍हाला सल्‍ले देण्‍यापेक्षा सहकार चळवळीचे प्रश्‍न राज्‍यातच सोडवा असा सल्‍ला केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी दिला.


या परिषदेच्‍या निमित्‍ताने जिल्‍ह्यातील पद्मश्री पुरस्‍कार प्राप्‍त पोपटराव पवार, श्रीमती राहीबाई पोपेरे यांचा गौरव तसेच पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्‍य जीवन गौरव पुरस्‍कार प्राप्‍त डॉ.रमेश धोंडगे यांचा मंत्री अमित शाह यांच्‍या हस्‍ते सन्‍मान करण्‍यात आला. प्रवरा परिवार आणि भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने अमित शाह यांच्‍यासह सर्व मान्‍यवरांना बैलगाडीची प्रतिकृती देवून सन्‍मानित करण्‍यात आले.

परिषदेत मार्गदर्शन करताना मंत्री अमित शाह यांनी राज्‍य सरकारचा नामोल्‍लेख न करता शालजोडे लगावले. १०० वर्षांची परंपरा असलेल्‍या या सहकार चळवळीला अजुन १०० वर्षे मजबुतीने पुढे न्‍यायचे असेल तर, या चळवळीतील दोष दुर करुन, पुढे जावे लागणार आहे. काही वर्षापुर्वी राज्‍यातील सहकार हा देशासाठी एक आयडियल मॉडेल म्‍हणून चर्चेत होता. जिल्‍हा सहकारी बॅंकाची नावही देशभर घेतली जायची, मात्र आज सहकारी साखर कारखानदारीसह जिल्‍हा सहकारी बॅंकाची परिस्थिती पाहिली तर, या सहकारी संस्‍थांमध्‍ये वाढलेली बजबजपुरीच कारणीभूत असल्‍याचा थेट आरोप त्‍यांनी केला.


सहकार चळवळीच्‍या सद्यस्थितीवर भाष्‍य करताना अमित शाह म्‍हणाले की, या चळवळीत काम करताना कोणी काय केले, याबद्दल दोषारोप करण्‍यात आता आम्‍हाला रस नाही. या चळवळीच्‍या भविष्‍यासाठी काय करता येईल हा विचार करुन, आम्‍ही पुढे जात आहोत. स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव संपन्‍न होत असताना प्रधानमंत्र्यांनी सहकार मंत्रालय स्‍थापन करण्‍याचा निर्णय घेतला. केंद्रामध्‍ये मोदीजींच्‍या नेतृत्‍वाखाली सरकारने पुढाकार घेतल्‍यामुळेच हा ऐतिहासिक निर्णय होवू शकला. या सहकारीकरणाच्‍या मजबुतीकरणासाठी केंद्र सरकार निश्चित असे धोरण घेवून, रात्रंदिवस काम करेल असेही त्‍यांनी आश्‍वासित केले.

Last Updated : Dec 18, 2021, 6:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details