महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sudha Murthy : ब्रिटनच्या पंतप्रधानांची सासूबाई म्हणतात, महाराष्ट्र माझी जन्मभूमी तर... - British Prime Minister Rishi Sunak

इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा ( Sudha Murthy Chairperson Infosys Foundation ) तथा इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक ( Prime Minister of England Rishi Sunak ) यांच्या सासू सुधा मूर्ती ( Sudha Murthy ) यांनी सोमवारी मध्यान्ह आरतीनंतर साईदरबारी हजेरी लावून साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी साईबाबा संस्थानच्या ( Shirdi Saibaba ) वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी त्यांचा साईबाबांची मुर्ती शाल देऊन सत्कार केला.

Sudha Murthy
सुधा मूर्ती

By

Published : Dec 26, 2022, 8:15 PM IST

Updated : Dec 26, 2022, 9:01 PM IST

इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती

शिर्डी -भगवान कृष्णाला देवकी आणी यशोदा दोन आई होत्या. मात्र कृष्ण एकच होता. आई दोन असुदे मात्र आम्ही एकच भारतीय आहोत. मी कानडी असली तरी माझी संस्कृती मराठी आहे. कर्नाटक, महाराष्ट्र सीमेवरील बेळगाव, धारवाड, कोल्हापूर, सोलापूर येथील भाषिक, संस्कृती एकच आहे, असे मला वाटते."लेक लाडकी या घरची होणार सुन मी त्या घरची असे स्पष्ट मत कर्नाटक महाराष्ट्र सिमावाद प्रश्नी ( Maharashtra border dispute ) जेष्ठ लेखीका तथा इंम्फोसीस फाउंडेशनच्या अध्यक्षा पद्मश्री श्रीमती सुधा मूर्ती ( Sudha Murthy, Chairperson, Infosys Foundation ) यांनी शिर्डीत व्यक्त केले.

सुधा मूर्ती साईबाबांचे दर्शन घेतांना

मूर्ती यांचा साईबाबांची मुर्ती शाल देऊन सत्कार -भारतीय शिक्षणतज्ञ इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू श्रीमती सुधा मूर्ती यांनी सोमवारी मध्यान्ह आरतीनंतर साईदरबारी ( Shirdi Saibaba ) हजेरी लावून साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी त्यांचा साईबाबांची मुर्ती शाल देऊन सत्कार केला. दर्शनानंतर त्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठ्या साईबाबा संस्थानच्या मेगा प्रसादालयात भोजनाचा आनंद घेतला.

जन्मभूमी महाराष्ट्र -यानंतर पत्रकारांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद ( Karnataka Maharashtra Borderism ) याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, कर्मभूमी माझी कर्नाटक असली तरी जन्मभूमी महाराष्ट्र आहे. कोल्हापुरात शिक्षण झाल्यामुळे मला मराठी भाषेची आवड आहे. दोन्ही राज्यात भाषांवरून वाद योग्य नाही. घरामध्ये दोन भावंडे असतात दोन्ही मिळून आनंदात राहा, चांगले काम करा एवढाच मी सांगते. उदांत विचार करायला पाहिजे देशातील गरिबी कमी करण्यासाठी लक्ष दिले पाहिजे. मुलींचे शिक्षण स्वच्छता आधी बाबींसाठी विचार व्हायला हवा. गोरगरिबांसाठी काम करायला मला आवडते त्यामुळे मी राजकीय दृष्टीने कधीच विचार करत नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.


साईबाबांचे दर्शन घेऊन मानसिक आनंद -मी शिर्डीला १९७४ साली आले होते.आता शिर्डी मोठा बदल झाला आहे.साईबाबांचे दर्शन घेऊन मानसिक आनंद मिळतो.येथे येऊन मला खूप बरं वाटलं शिर्डी हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक आणी केंद्र आहे. बाबांनी आपल्या हयातीत अन्नदान, प्राणीमात्रांवर प्रेम दया केली आहे. साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदी संंधी मिळाली तर जरूर स्विकारेन. वैष्णव देवी मंदिर याठिकाणी नऊ वर्षे विश्वस्तपद सांभाळले. तसेच तिरुपती बालाजी देवस्थानच्या विश्वस्तपदी तीन वेळा निवड झाली.आकस्मात बाबांची इच्छा असेल तर माझ्याकडून काय शक्य होईल तितके मी नक्की करेन. त्याचा उपयोग लोकांच्या मदतीसाठी करेल. माझे नातेवाईक यांना स्पेशल दर्शन करण्याचा मुद्दा नसल्याची खोचकपणे टिका त्यांनी नांव न घेता केली.

लोकांना मदत करायला हवी -जावई ऋषी सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान झाल्यावर कोणत्या सासूला आनंद होणार नाही. साहजीकच आहे मलाही आनंद वाटतो. ते त्यांच्या देशासाठी काम करतात मी माझ्या देशासाठी काम करत आहेत. जावई पंतप्रधान झाल्यापासून मी इंग्लंडला गेले नाही. त्यापुर्वी गेले होते. त्यांना खुप काम आहे. आम्हाला देखील इकडे काम कमी आहे का असे मिश्कीलपणे सांगितले. खुप पैसे असेल तर आनंद मिळतो असे काही नाही. आपल्याला जेवढी गरज असेल तेवढेच पैसे ठेवायला हवे उरलेलं सगळे समाजातील लोकांना मदत करायला हवी. त्यांना आनंदी ठेवल्यास आपण आनंदी राहातो अशी भावना व्यक्त करत हिच साईबाबांची खरी शिकवण असल्याचे त्यांनी सांगितले. साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात पिठलं भाकरी खाऊन मन प्रसन्न झाल्याचे सांगून मला माहेरची आठवण झाली. येथील लोक खुप प्रेमळ असल्याचा अभिप्राय त्यांनी प्रसादालयाच्या शेरा बुकमध्ये त्यांनी नोंद केला.

Last Updated : Dec 26, 2022, 9:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details