महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीतील विमानसेवा आज ठप्प, दिवसभरातील उड्डाणे रद्द - ahmadnagar

दिल्लीहून आलेले विमान दुपारी साडेचार वाजता शिर्डी येथे पोहोचले होते. विमानतळावरुन उतरताना ते धावपट्टीवरुन घसरले. यातील प्रवासी तब्बल साडेतीन तास विमानातच अडकले होते. संध्याकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी यातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

धावपट्टीवरुन घसरलेले विमान

By

Published : Apr 30, 2019, 12:41 PM IST

Updated : Apr 30, 2019, 1:43 PM IST

अहमदनगर - शिर्डीहून निघणारी विमाने आज रद्द करण्यात आली आहेत. काल स्पाईस जेट कंपनीचे विमान धावपट्टीवरुन घसरले होते. त्यामुळे शिर्डी विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

शिर्डी विमानतळाची सर्व उड्डाणे आज रद्द करण्यात आली आहेत

दिल्लीहून आलेले विमान दुपारी साडेचार वाजता शिर्डी येथे पोहोचले होते. विमानतळावरुन उतरताना ते धावपट्टीवरुन घसरले. यातील प्रवासी तब्बल साडेतीन तास विमानातच अडकले होते. संध्याकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी यातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

विमान धावपट्टीवरुन घसरण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी मुंबईहून शिर्डीला आलेले विमान धावपट्टीवर घसरले होते. या घटनेची चौकशी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. डिजीसीएचे पथक विमानतळावर दाखल झाले आहे. तोपर्यंत सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला आहे.

Last Updated : Apr 30, 2019, 1:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details