अहमदनगर- गेल्या 2 दिवसात सह्याद्रीच्या रांगेमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे त्रंबकेश्वरजवळ उगम पावणाऱ्या गोदावरी नदीला पूर आला आहे. तसेच मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात रविवारी 1 लाख 30 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्याबरोबरच संध्याकाळपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने कोपरगाव आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गोदावरी नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग संध्याकाळपर्यंत वाढणार असल्याने कोपरगाव आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगावात तातडीने बैठक घेतली.