अहमदनगर -एकीकडे जागतिक महिलादिन साजरा होत होता, तर दुसरीकडे जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील खानापूर येथे शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार करत तिचा खून करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपीला शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. परिसरातील तीन ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्याच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.
अकोले बलात्कार प्रकरण: अद्यापही आरोपी गजाआड नाहीत, पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न चालूच हेही वाचा -मुंबईत कोरोनामुळे धुलिवंदनाच्या उत्साहावर विरजण; फक्त चिमुकल्यांकडून धुळवड साजरी
पोलिसांनी अतापर्यंत तीन जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. आज किंवा उद्या आम्ही आरोपीपर्यंत पोहोचू, असा विश्वास संगमनेरचे उपविभागीय अधिकारी रोषण पंडीत यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
32 वर्षीय गतीमंद महिला आदिवासी आश्रम शाळेच्या जवळ असलेल्या डोंगराळ भागात शेळ्या चरण्यासाठी गेली होती. नेहमी तिच्याबरोबर कोणी ना कोणी असते. मात्र, शनिवारी ती एकटची होती. ती संध्याकाळी घरी आलीच नाही. मात्र, शेळ्या घरी आल्या. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता गावठाणातील काटवनात तिचा मृतदेह आढळून आला. यावेळी तिच्या तोंडात टॉवेलचा बोळाही कोंबण्यात आल्याचे निदर्शनास आले होते.
महिलेचा मृतदेह सापडल्याची बातमी पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेत उच्चस्तरीय तपासणीसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णायलात पाठवला. त्यात तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आमच्या बहिणीच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यास फाशीची शिक्षा देण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
हेही वाचा -जगभरात कोरोनामुळे ४ हजार जणांचा मृत्यू; चीनबाहेर २८ हजार नागरिकांना लागण