अहमदनगर- पुत्रप्राप्तीसाठी सम-विषम तिथीचा फॉर्म्युला दिल्यानंतर कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर अडचणीत आले आहेत. यानंतर अनेकांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यातील सर्वजण एकवटले आहेत. अकोले तालुक्यातील नागरिकांनी इंदोरीकरांच्या समर्थनार्थ येत्या रविवारी तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ रविवारी 'हा' तालुका बंद - indorikar maharaj
अकोले तालुक्यातील नागरिकांनी इंदोरीकरांच्या समर्थनार्थ येत्या रविवारी तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवार 23 फेब्रुवारीला संपूर्ण तालुका बंद ठेवुन महाराजांचे गाव असलेल्या इंदोरीमधून येथून अकोलेपर्यंत मोटारसायकल रॅलीही काढण्यात येणार आहे.
अकोले तालुक्यातील इंदोरी येथे निवृत्ती महारांजाचा जन्म झाला. नंतर महारांजांना इंदोरीकर म्हणुनच त्यांच्या किर्तननातून लोक ओळखू लागले. याच इंदोरीकर महाराजांच्या किर्तनातुन आलेल्या पुत्र प्राप्तीच्या विधानामुळे गेली 8 दिवस वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास गेला गेल्याचे सांगत अनेकांनी महाराजांचे समर्थनही केले आहे. तर काहींनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. यावर महाराजांनी दिलगिरीही व्यक्त केलीयं. त्यानंतर अकोले तालुक्यातील वारकऱ्यांसह सर्वपक्षीय महाराजांच्या चाहत्यांनी एक होत महाराजांच्या समर्थनार्थ तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
इंदोरीकर महाराजांची नाहक बदनामी सुरू आहे. त्याचा अकोले तालुक्याच्या वतीने निषेध करुन महाराजांच्या समर्थनार्थ उभे राहण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे ठराव घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रविवार 23 फेब्रुवारीला संपूर्ण तालुका बंद ठेवुन महाराजांचे गाव असलेल्या इंदोरीमधून येथून अकोलेपर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी अकोले शहरात महात्मा फुले चौकातून टाळ मृदुंगाच्या गजरात बाजारतळापर्यंत मोर्चाही काढण्यात येणार असून अकोले बाजारतळावर निषेध सभा होणार आहे. तर यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदनही देण्यात येणार आहे.