अहमदनगर- आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला किंवा दहशत केली, तर जशास तसे उत्तर देऊ. आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोधकांना इशारा दिला. कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी खर्डा येथे अजित पवार यांची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
'आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, मलाही जशास-तसे उत्तर देता येते' - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम शिंदेकडून धमक्या, दमदाटी होत असल्याची तक्रार अजित पवारांकडे केली. त्यावेळी हा धागा पकडून पवार यांनी आपल्या खास ग्रामीण रांगड्या शैलीत मी आरेला कारे म्हणणारा माणूस आहे, असे सांगितले.
हेही वाचा - ...त्यांना कळून चुकलंय म्हणून मोदींसह अमित शाह महाराष्ट्रभर सभा घेतायेत
राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम शिंदेकडून धमक्या, दमदाटी होत असल्याची तक्रार अजित पवारांकडे केली. त्यावेळी हा धागा पकडून पवार यांनी आपल्या खास ग्रामीण रांगड्या शैलीत मी आरेला कारे म्हणणारा माणूस आहे. त्यामुळे जर कोणी दम दिला तर रात्री बारा वाजता कार्यकर्त्यांसाठी धावून येऊ. कार्यकर्त्यांवर दबाव आणला किंवा दहशत केली, तर जशास तसे उत्तर देऊ. आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत, असा इशारा अजित पवार यांनी दिला.