महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काळा चष्मा काढल्यानंतर त्यांना त्यांची काळी बाजू दिसायला लागली; अजित पवारांची पिचडांवर टीका - ahmednagar news

पिचडांनी लावलेला काळा चष्मा काढल्यानंतर त्यांना त्यांची काळीबाजू दिसायला लागली आणि ते भाजपात गेले, अशा शब्दात अजित पवारांनी पिचडांचे नाव घेता टीका केली. अकोलेतील बाजारतळावर झालेल्या जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.

अजित पवार

By

Published : Sep 23, 2019, 5:47 PM IST

अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मधुकर पिचडांना राज्यातील आणि जिल्ह्यातील सत्तेत चांगल स्थान दिले होते. मात्र, पिचडांनी लावलेला काळा चष्मा काढल्यानंतर त्यांना त्यांची काळी बाजू दिसायला लागली आणि ते भाजपात गेले, अशा शब्दात अजित पवारांनी पिचडांचे नाव घेता टीका केली. अकोलेतील बाजारतळावर झालेल्या जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.

बोलताना अजित पवार

मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अकोले विधानसभा मतदार संघातील पिचड विरोधकांची मोठ बांधत आज भाजपातील अनेकांना अकोल्यातील जाहीर सभेत प्रवेश दिला.

हेही वाचा - माध्यमांत चमकण्यासाठी लोक पवारांवर टीका करतात - रोहित पवार

पवार पुढे म्हणाले, अकोले तालुक्यातील सर्वांनी एकत्र येत पिचडांविरोधात एकच उमेदवार देण्याचे ठरवा आणि त्यावर कायम राहा. पिचड फार नाटकी आहेत ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे सांगतील, डोळ्यांत आश्रु आणतील मात्र त्यांच्या भुल थापांना बळी पडु नका, असे आवाहन पवारांनी केले.

हेही वाचा - राष्ट्रवादीतील 'त्या' नेत्याची दादागिरी भविष्यात खपवून घेणार नाही - माजी महापौर कळमकर

सीताराम गायकरचे काय झाले असा जनतेतून सूर उमटला असता विधानसभेला घड्याळाला मतदान करा. मग त्यांचे (सीताराम गायकर) धोतर फेडू, असे म्हणत अजित पवारांनी पिचडांचे निकटवर्तीय तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर यांच्यावरही हल्ला चढवला. आपल्या भाषणातून भाजपवर हल्लाबोल करत आमचे सरकार आले तर संपूर्ण कर्जमाफी देणार. दिली नाही तर पवारांची औलाद नाही. हे भाजपवाले थोर पुरूषांची नावे घेऊन सत्तेवर आले. पण, कोणतेही आश्वासन पूर्ण केली नाहीत, अशी टीकाही पवारांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details