अहमदनगर - गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून शेतात तेच ते पारंपरिक खाण्यांच्या पिकांचीच शेतीत मोठ्या प्रमाणात केल्या जाते. या पिकातून शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. त्यामुळे पारंपरिक पिकांना फाटा देण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्यायच उरला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील राहता तालुक्यातील रांजणखोल येथील स्वप्निल दौंड या प्रयोगशील शेतकऱ्यांने आपल्या शेतात जिरेनियमची लागवड केली. जिरेनियमच्या पाल्यापासून तेल तयार केले. या तेलाला १२ हजार ५०० रुपये लीटर या दर मिळाल्याने तीन महिन्यात दोन एकर शेतीत दोन लाखाचा नफा मिळवला आहे.
ॉ
जिरेनियमचे तेल १२ हजार ५०० रूपये लीटर -
राहाता तालुक्यातील रांजणखोल येथील स्वप्निल दौंड या प्रयोगशील शेतकऱ्यांने आपल्या शेतात जिरेनियमची लागवड केली आहे. त्याच बरोबरीने डिसलरी प्रकल्प ही उभारत ते स्वतः तेलनिर्मिती देखील करत असुन त्यांनी ‘फार्म टू बॉटल’ या संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे. जिरेनीयमच्या पानांवर प्रक्रिया करुन त्यापासुन तेल तयार केले जाते. या तेलाला मार्केटमध्ये सर्वाधिक मागणी आहे. आपण दैनंदिन वापरत असलेल्या सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर, परफ्युम तयार करण्यासाठी जिरेनीयम तेलाचा वापर केला जातो. सध्या तरी तब्बल १२ हजार ५०० रूपये लीटर प्रमाणे दर या तेलाला मिळत असल्याचे स्वप्निल दौड यांनी सांगितले आहे.
पहिल्या कापणी नंतर लगेच उत्पन्न सुरु -
जिल्ह्याबरोबर राज्यातील अनेक शेतकरी जिरेनीयमच्या शेतीकरण्याकडे कल वाढतोय. अनेक तरुण शेतकरी याची लागवड शेतीत करत आहे. अगदी सहज पिकणारे हे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिके सोडून जिरेनियमची शेती करण्यास सुरूवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शिऊर येथील काही तरुणांनी नगर जिल्ह्यात येऊन या शेतीची माहिती घेतली. व घरच्या शेतीत त्याची लागवड केली. सहा रुपयांना जिरेनियमचे एक रोप मिळते. पहिल्या तीन ते चार महिन्यात याची कापणी होते. पहिल्या कापणी नंतर लगेच उत्पन्न सुरु होते.