अहमदनगर - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (२३ एप्रिल) पार पडत आहे. सुरुवातीपासून चर्चेत असलेल्या अहमदनगर दक्षिण मतदारसंघासाठीही मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शी आणि अडथळ्याशिवाय पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस-प्रशासन सज्ज झाले आहे.
एकूण ८ हजार ९३२ अधिकारी आणि कर्मचारी निवडणुक प्रकियेत काम करणार आहेत. कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी ६४६ वाहने जीपीएस यंत्रणेसह तैनात करण्यात आली आहेत. तर, ४ हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी निवडणुक प्रकिया शांततेत पार पडण्यासाठी काम करणार आहेत. अधिकृत जाहीर प्रचाराची मुदत २१ एप्रिलला संपली आहे. आज (सोमवारी) निवडणूक कर्मचारी निवडणूक साहित्य ताब्यात घेवून नेमून दिलेल्या मतदान केंद्राकडे जाणार आहेत.
अहमदनगर दक्षिण मतदार संघाचा आढावा -
एकूण मतदार संख्या - १८ लाख ५४ हजार २४८
पुरुष - ९ लाख ७० हजार ६३१
महिला - ८ लाख ८३ हजार ५२९
इतर - ८८
मतदान केंद्र - २ हजार ३०
सूष्म मतदान केंद्र - १५२
वेबकास्टिंग मतदान केंद्र - १९२
क्षेत्रीय अधिकारी - १९८
विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार :
१. शेवगाव
एकूण - ३,३८,७८८
पुरुष - १,७७,४९७
महिला - १,६१,२८४
इतर - ७