अहमदनगर -श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत एक चांगलेच नाट्य पहायला मिळाले. नेहमीच आपल्या संयमाने सर्वांना चकित करणाऱ्या शरद पवारांचा संयम एका पत्रकाराच्या प्रश्नावर सुटला. इतकंच नाही तर ते पत्रकार परिषद सोडून निघालेही.
तुम्ही माफी मागा मग बोला...पत्रकाराच्या प्रश्नावर शरद पवार भडकले - शरद पवार news
श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे एका पत्रकाराच्या प्रश्नावर चांगलेच संतापले. पत्रकाराने विचारलेला प्रश्न पवारांच्या इतका जिव्हारी लागला की, ते पत्रकार परिषद सोडून निघालेही...पण राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी विनंती केली, तेव्हा ते थांबले.
तुमचे नातेवाईक पण पक्ष सोडून जातायत....
श्रीरामपूरच्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच हा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला, आणि पवार भडकले.
पक्ष सोडून जाणारे नेते असतात, कार्यकर्ते नाही... यावर पत्रकाराने पद्मसिंह पाटील हे तुमचे नातेवाईक पण जात आहेत, असे विचारताच पवारांच्या संयमाचा बांध फूटला आणि त्यांनी पत्रकारालाच फैलावर घेतले. या नंतर झालेल्या बोलाचालीत पवार शेवटी पत्रकार परिषद सोडून निघालेही होते. पण राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी विनंती केली, तेव्हा ते थांबले.