महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने घेतला गळफास - अहमदनगर आत्महत्या न्यूज

प्रेयसीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने प्रियकराने देखील गळफास घेत आयुष्य संपवले. ही घटना जामखेड तालुक्यातील आपटी या गावात घडली. एकाच दिवशी अल्पवयीन मुलगी आणि मुलाने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

अहमदनगरमध्ये प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने घेतला गळफास
Ahmednagar Minor Girl Commits Suicide later Boyfriend hangs self in farm

By

Published : Nov 25, 2021, 10:44 AM IST

अहमदनगर -जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी प्रेयसीच्या (वय 16) आत्महत्यानंतर काही तासातच प्रियकर मुलाने (Ahmednagar Couple Suicide) देखील गळफास (Suicide in Jamkhed) घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एकाच दिवशी दोघांनी आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, प्रेयसीने आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. अशोक बंडू कडू (वय 17) असे प्रियकराचे नाव आहे.

एकाच दिवशी दोघांनी आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ

बुधवार जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी प्रेयसीने दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती माहिती याच गावात राहणार्‍या तिचा प्रियकर अशोक बंडू कडूला समजली. यानंतर आपल्या प्रेयसीने नक्की आत्महत्या केली आहे का? याची खात्री करण्यासाठी तो प्रियकर अशोक हा मुलीच्या घरी गेला. त्यावेळी आपल्या प्रेयसीने आत्महत्या केली असल्याचे त्याला समजले. यानंतर सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला. यानंतर अशोकने देखील व्हॉटसपवर मी देखील माझे जीवन संपवत आहे, असे स्टेट्स ठेवत दुपारी तीनच्या दरम्यान शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दोघांनीही आत्महत्या का केली याची माहिती समोर आलेली नाही. दोघांचे प्रेम संबध होते, अशी माहिती समोर येत आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सपोनि सुनिल बडे, पो. ना संभाजी शेंडे, पो. कॉ. शशी मस्के व पो. कॉ. संजय जायभाय यांनी भेट दिली. पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलीने आत्महत्या केल्यावर मुलीकडील मंडळी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत होते. पण मुलानेही आपली जीवनयात्रा संपवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details