अहमदनगर - जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना यंदा द्राक्ष आबंटच ठरली आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बागेत हिरवी गार द्राक्ष्यांची घडे लटकलेलीच दिसुन येतायेत. मात्र ही द्राक्षे व्यापाऱ्यांनी खरेदी करावी, यासाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांची अक्षरश विनवणी करावी लागतेय. ( Ahmednagar Grape Growers Farmers in crisis )
शेतकऱ्यांच्या हातात काय पडणार - जिल्ह्यात सुमारे 20 ते 25 हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष उत्पादन घेतले जाते. यंदा सरासरी 15 ते 17 टन एवढे विक्री उत्पादन झाले. मे महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात किलोमागे 50 रुपये दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी उशिराने बागेची छाटणी केली होती. मात्र असे न घडता आता उत्तरेकडील राज्यातून द्राक्षांची मागणी घटल्याने व्यापारी माल खरेदी करायला तयार नाही. त्यामुळे हा माल वाईन कंपन्यांना विकावा लागणार आहे. मात्र दहा रुपये किलो पेक्षाही कमी दराने माल कंपन्या घेतील त्यात शेतकर्यानेत मालाची तोडणी, भरणी करुन माल कंपनीपर्यंत माल पोहोच करायता त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काय पडणार हा प्रश्न आहे.
द्राक्ष बागेची छाटणी करण्याचे शेतकऱ्यांवर संकट - राहाता तालुक्यातील जळगाव चितळी परीसरात तर द्राक्ष बागाच भयावह वास्तव्य बघावयास मिळतय. येथील सर्जेराव चौधरी या युवकाने चांगल्या पगाराची नौकरी सोडुन द्राक्ष शेती केली. त्याने क्रॉप सायन्सच शिक्षणही घेतलेल्या आहे. मात्र निसर्गाचे पुढे त्यानेही हात टेकले. गेल्या डिसेंबरमध्ये या परिसरात अवकाळी गारपिटीने द्राक्ष बाग झोडपली गेली. त्याचा परिणाम आता दिसुन आलाय. चौधरी यांचा माल काढणीला आला. मात्र अवकाळीच्या फटक्यामुळे द्राक्षाला गोडी उतरली नसल्याने शेकडो टन माल खाण्या लायक राहिला नाही. तो चार दिवसात पड्या भावाने का होईना, वाईन कंपन्यांनी घेतला नाही तर पुढील आठवड्यात तो खराब होणार आहे. त्यामुळे मालासह बागेची छाटणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे.