अहमदनगर -जिल्ह्यातील तिसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने ही व्यक्ती आजारातून बरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या रुग्णाला आज सायंकाळी घरी सोडण्यात आले. बूथ हॉस्पिटलमधील आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी या रुग्णाला टाळ्या वाजवत घराकडे रवाना केले.
अहमदनगरकरांना दिलासा: तिसरा कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी परतला... - अहमदनगर कोरोना रुग्ण डिस्चार्ज
कोरोनाबाधित तिसरा रुग्ण बरा करण्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेला यश आल्याने नगरकरांचा आरोग्य यंत्रणेवर विश्वास वाढला आहे. जिल्ह्यात एकूण २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यातील ३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
अहमदनगरकरांना दिलासा: तिसरा कोरोनाबाधित रुग्ण बरा होवून घरी परतला...
बरा झालेला रुग्ण पुढील 14 दिवस घरीच देखरेखीखाली राहणार आहे. कोरोनाबाधित तिसरा रुग्ण बरा करण्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेला यश आल्याने नगरकरांचा आरोग्य यंत्रणेवर विश्वास वाढला आहे. जिल्ह्यात एकूण २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यातील ३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाबाधित रुग्णावर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात. ही माहिती डॉ. वैजनाथ गुरवले यांनी दिली.