अहमदनगर - राजकारणात उच्चशिक्षित युवा वर्ग आला पाहिजे. त्यासाठी डॉ. सुजय यांना संधी द्या, असे आवाहन युतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी केले. आम्ही केवळ राजकारणच नाही तर समाजकारणातही भरीव कामे केली आहेत. डॉक्टर असतानाही सुजय यांनी आपला व्यवसाय बाजूला ठेवत समाजसेवेसाठी राजकारणात उडी घेतली असल्याचेही त्या म्हणाल्या.
विखे कुटुंबाचे राजकारणासह समाजकारणातही भरीव काम, डॉ. सुजय यांना संधी देण्याचे धनश्री विखेंचे आवाहन - SUJAY VIKHE
टाकळी ढोकेश्वर येथे नगर दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आयोजीत महिलांच्या बैठकीत धनश्री विखे बोलत होत्या. महिलांनी दोन्ही उमेदवारांचे अभ्यास करून मतदान करावे. विखे परिवाराची माहिती घ्या. आम्ही केवळ राजकारणच नाही तर समाजकारणातही भरीव कामे केली असल्याचे धनश्री विखे म्हणाल्या.

या बैठकीस मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी आमदार विजयराव औटी यांच्या पत्नी जयश्री औटी, धनलक्षमी पतसंस्थेचे संस्थापक आरती कटारिया, पंचायत समितीच्या माजी सदस्या प्रतिभाताई खिलारी, भाळवणी गावचे सरपंच रोहकले, भाजप महिला तालुका अध्यक्ष अश्विनी थोरात, टाकळी ढोकेश्वर गावचे सरपंच सुनीता झावरे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या. यावेळी धनश्री विखे यांनी सुजय विखेंना मतदान करण्याचे आवहन महिलांना केले.